Satara news esakal
सातारा

Satara : सातारा वाहतूक पोलिसांचा फंडा : महाविद्यालय परिसरात वाहतुकीला शिस्त

दंडासोबत आता पालकांचे समुपदेशन

सकाळ डिजिटल टीम

सातारा : महाविद्यालय परिसरातील वाहतुकीला शिस्त आणण्याबरोबरच हुल्लडबाजी रोखण्यासाठी वाहतूक शाखा सरसावली आहे. त्यातून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच संबंधितांच्या पालकांना बोलावून समुपदेशन करण्याचा फंडाही अवलंबला जात आहे. त्यामुळे नियमबाह्य वाहन चालविणाऱ्या पालकांनाही पोलिसांसमोर हजर राहावे लागणार आहे. छेडछाडीचे प्रकार करणाऱ्यांवरही यादरम्यान कारवाई होणार आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या युवकांवर दंडात्मक कारवाई होत आहेच; परंतु त्या वाहतूक शाखेकडून संबंधित युवकांच्या पालकांना बोलावून वाहतूक नियमांबाबत त्यांचे समुपदेशन होत आहे. या फंड्यांमुळे अशा युवकांच्या वर्तणुकीत बदल होण्यास मदत होणार आहे.

वाहतूक शाखेचा पुढाकार

महाविद्यालय परिसरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेने पुढाकार घेतला आहे. सहायक निरीक्षक अभिजित यादव यांनी त्यासाठी गेले दोन दिवस वाहतूक शाखेच्या वतीने महाविद्यालय परिसरात तपासणी मोहीम सुरू केली आहे. त्यात दुचाकी चालकांची तपासणी करण्यात येत आहे. पोलिसांच्या वावराचा महाविद्यालय परिसरात परिणाम जाणवू लागला आहे.

सातारा शहरातील महाविद्यालय परिसरात होणारी हुल्लडबाजी, गाड्यांवरून स्टंटबाजी सुरू असते. त्यातून महाविद्यालयात येणाऱ्या मुलांना विशेषत: विद्यार्थिनींना असुरक्षित वातावरण निर्माण होते. त्याचबरोबर अपघाताचे प्रसंगही उद्‌भवतात. त्यात महाविद्यालयाबरोबरच बाहेरील विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग असतो. अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याबरोबरच महाविद्यालयीन जीवनाचा आनंद घेण्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालय परिसरात सुरक्षित वातावरणाची आवश्यकता असते. ते साताऱ्यात बिघडत चालले होते. याबाबत दै. ‘सकाळ’नेही वृत्त प्रसिद्ध केले होते.

पालकांवर होतो गुन्हा

महाविद्यालय परिसरात अनेक अल्पवयीन मुलेही गाडी चालविताना आढळून येतात. अशा मुलांकडून अपघात झाल्यास संबंधितांच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्याची तरतूद कायद्यात आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या हातात गाडी देण्याचे परिणाम पालकांवरही होणार आहेत. वाहतूक शाखेचे या मोहिमेमुळे पालकांत या कायद्याबाबत जागृती होत आहे.

छेडछाडीवरही बडगा

महाविद्यालय परिसरात वाहतूक नियमासंदर्भात वाहतूक शाखेचे कारवाई सुरू आहे. त्याचबरोबर छेडछाड करून मुलींसाठी असुरक्षित वातावरण निर्माण करणाऱ्यांवरही वाहतूक शाखेकडून बडगा उभारण्यात येणार आहे. त्या दृष्टीने महाविद्यालय परिसारत वाहतूक शाखेची नजर राहील.

महाविद्यालय परिसरात सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू आहे. ही मोहीम सातत्याने राबविण्यात येणार आहे. महाविद्यालय परिसरात कोणाकडून त्रास होत असेल, तर युवतींनी वाहतूक शाखा, निभर्या पथक किंवा डायल ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

- अभिजित यादव, सहायक पोलिस निरीक्षक शहर वाहतूक शाखा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT