सातारा : सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना चाचणीतून covid19 test येणारी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जवळपासून 1200 च्या आसपास येत आहे. दरराेज मृत्यूची संख्या 25 पेक्षा अधिक आहे. त्यामुळे सातारा जिल्हा पुन्हा एकदा आता "रेड झोन' red zone मध्ये जाणार की काय असा प्रश्न नाही सोशल मीडियातून विचारला जात आहे. तसेच लाॅकडाउन lockdown जिल्ह्यात वाढणार याबाबतचे तर्क-वितर्क लढविले जात आहेत. काहींनी रेड झोनमध्ये जिल्हा जाणार काय ? अशी विचारणा माध्यमांकडे देखील करण्यास सुरू केली आहे. परंतु, रेड झोन म्हणजे नेमके काय, तो कोण ठरवितो, ते कसे तयार होतात असा प्रश्न तुम्हांलाही पडला असेलच ना? जिल्हा रेड झाेन झाल्यास लाॅकडाउनमधील निर्बंध कडक राहतात. satara-trending-news-lockdown-red-zone-vijay-wadettiwar
रेड झोनचा जिल्हा किंवा हॉटस्पॉट म्हणून जिल्हा ठरविण्याचे सर्वाधिकार भारत सरकारच्या कुटुंब आणि आरोग्य मंत्रालयाकडे आहेत. यामध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या, पॉझिटिव्ह रुग्णांच्या वाढीचा वेग, चाचण्यांची मर्यादा आणि रुग्णांवर पाळत ठेवून आलेला फिडबॅक यावर रेड झोन ठरविण्याचे अधिकार संबंधित खात्याला आहेत.
सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये सुमारे 18 हजार 673 रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत सातारा जिल्ह्यात 3425 रुग्णांचा काेराेनामुळे मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी रविवारी दिली. आजही (साेमवार) 14356 नागरिकांच्या तपासणीअंती दाेन हजार 648 नागरिकांना काेविड 19 ची बाधा झाल्याची माहिती आराेग्य विभागाने दिली. दरम्यान उपचार घेऊन बरे हाेण्याचे प्रमाण जरी चांगले असले तरी आजही व्हेंटिलेटर बेडसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना धावाधाव करावी लागत आहे.
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार vijay wadettiwar यांनी आज (साेमवार) मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत रेड झोनमधील जिल्हे वगळता राज्यातील लॉकडाउन एक जूननंतर शिथिल होण्याची शक्यता वर्तवली आहे. सातारा जिल्ह्यातील काेराेनाची परिस्थिती आटाेक्यात आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आराेग्य मंत्री राजेश टाेेपे यांनी स्वतः लक्ष घालावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी केली आहे.
सातारा जिल्ह्यात नव्या रुग्णांच्या बरोबरीने बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता तसेच मृत्यूचा दर पाहता जिल्हा रेड झाेनमध्ये जाईल की काय अशी विचारणा हाेऊ लागली आहे. जिल्हा रेड झाेनमध्ये गेल्यास पुन्हा लाॅकडाउनच्या नियमांत शिथिलता येणार नाही. जूून अखेर कडक निर्बंधात राहावे लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.