सातारा

रुग्णवाहिकेविना काेराेनाबाधित तब्बल दीड दिवस घरातच

सकाळ वृत्तसेवा

म्हसवड : कोरोनाबाधित रुग्ण तब्बल 36 तास उपचाराविना घरीच ठेवल्याची संतापजनक घटना माण तालुक्‍यातील दिवड येथे घडली. बाधित रुग्ण तब्बल दीड दिवस गावातच घरी राहिल्याने घाबरलेल्या दिवडकरांनी आरोग्य आणि महसूल प्रशासनाच्या बेफिकीर ढिसाळ कारभाराबाबत संताप व्यक्त केला. संबंधित महिला, मुलगी व तिच्या लहान बाळासह मुंबईहून माण तालुक्‍यातील दिवड या गावी आली होती.
 
मुंबई येथेच या महिलेचा कोरोनाबाधित असल्याचा अहवाल शनिवारी (ता. 30) रात्री आला होता; परंतु त्यापूर्वीच त्या दिवड गावी तिची मुलगी व नातीसमवेत खासगी वाहनाने पोचल्या होत्या. संबंधित महिलेस कोरोनाची लागण झाल्याचे समजताच गावकऱ्यांची भीतीने गाळण उडाली. त्यानंतर पोलिस आणि आरोग्य यंत्रणा गावात आल्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या. संपूर्ण गाव सील करण्यात आले. बाधित रुग्णाला पुढील उपचारासाठी त्वरित सातारा किंवा कऱ्हाडला नेण्यात येईल, असे दिवडकरांना वाटले; परंतु रविवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत काहीच हालचाली झाल्या नाहीत. आरोग्य विभागाकडून साताऱ्याला गेलेली रुग्णवाहिका रात्री साडेआठ वाजेपर्यंत रुग्णाच्या घरी येईल, असे सांगण्यात आले होते; परंतु बाधित महिलेला आणि तिच्या मुलीला रविवारची संपूर्ण रात्र घरातच रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत काढावी लागली.
 
दरम्यानच्या कालावधीत रविवारी दिवसभर ग्रामपंचायत पदाधिकारी आणि दक्षता समितीनेही प्रशासनाला फोनवरून वारंवार संपर्क करून बाधित महिलेला रुग्णालयात नेण्याची विनंती केली. मात्र ढिम्म प्रशासनाकडून कोणत्याच हालचाली झाल्या नाहीत. 
सोमवारी सकाळीही प्रशासनाकडून कोणतीच हालचाल होत नसल्याचे पाहून ग्रामस्थांनी माणचे आमदार जयकुमार गोरे यांना संपर्क साधला. घटनेची माहिती दिल्यानंतर संबंधित रुग्ण व ग्रामस्थांच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक आणि प्रांताधिकाऱ्यांशी संपर्क साधला. बाधित महिलेला उपचारासाठी नेण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर प्रशासनाने वेगाने हालचाली करून बाधित महिलेला दुपारी बाराच्या सुमारास पुढील उपचारासाठी कोविड रुग्णालयात नेले; पण दुपारपर्यंत बाधित महिलेच्या मुलीलाही विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले नव्हते. गावच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने त्वरित हालचाली कराव्यात, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य सतीश घुटुगडे यांनीही केली. 

कोरोना बाधित महिलेला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी आम्ही दीड दिवस प्रशासानाला विनंती केली. मात्र, रुग्णामध्ये तीव्र लक्षणे दिसतच नाहीत. रुग्णवाहिका उपलब्ध नाही. रुग्णालयात बेडच उपलब्ध नाहीत, अशी कारणे देऊन टाळाटाळ करण्यात आली. गावकरी भीतीच्या छायेत वावरत असताना आम्ही प्रतिबंधात्मक उपाययोजना करून गाव बंद केले.
- रामचंद्र सावंत, सरपंच (दिवड, ता. माण) 

 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ अखेर संपला! ‘या’ महत्वाच्या खटल्यांवर दिले निर्णय

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

Sakal Natya Mahotsav 2024 : संकर्षण कऱ्हाडे यांच्या उत्तमोत्तम नाटकांची रसिकांना मेजवानी १५ ते १७ नोव्हेंबरला

SA vs IND 1st T20I: संजू सॅमसनचं वादळी शतक, पण नंतर दक्षिण आफ्रिकेचं पुनरागमन; तरी भारत २०० धावा पार

Champions Trophy 2025 : BCCI पाकिस्तानात न जाण्यावर ठाम; PCB म्हणते लेखी द्या, मग बघतोच...! IND vs PAK यांच्यात 'वॉर' जोरदार

SCROLL FOR NEXT