सातारा

कोरोना बाधितांच्या अंत्यसंस्कारास सातारा जिल्ह्यात "या' गावांचा विरोध

सकाळ वृत्तसेवा

लोणंद : शहराच्या हद्दीतील खोत मळ्यातील ओढ्याकाठाच्या स्मशानभूमीत लोणंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 56 गावांतील कोरोनाबाधित मृतांचे अंत्यसंस्कार येथे करण्याच्या प्रशासनाच्या फतव्यास खोतमळा (लोणंद) व कापडगाव (ता. फलटण) ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशाराही या ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. 

दरम्यान, तांबवे (ता. फलटण) येथील मुंबईवरून आलेल्या एका 94 वर्षांच्या मृत्यू झालेल्या वृद्धाचा प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर रात्री उशिरा येथील स्मशानभूमीत नगरपंचायतीच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. शहराच्या हद्दीत खोतमळा येथे सरहद्देच्या ओढ्याकाठी असलेली स्मशानभूमी ही शहरात कोणी कोरोनामुळे मृत्यू पावल्यास त्यांच्या अंत्यविधीसाठी आरक्षित केली आहे. नगरपंचायतीने जिल्हा प्रशासनाला तसे पत्राद्वारे कळवले आहे. मात्र, फलटणचे प्रांताधिकारी यांनी लोणंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 56 गावांतील कोणी कोरोनामुळे मृत्यू पावल्यास त्यांचेही अंत्यसंस्कार याच स्मशानभूमीत करण्याचा आदेश काढला आहे. दरम्यान, खोतमळा व कापडगाव येथील नागरिकांनी या आदेशाला विरोध करून तांबवेतील त्या वृद्धाचा अंत्यविधी करण्यास रोखले. त्या वेळी काहीशी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, नगराध्यक्ष सचिन शेळके- पाटील, मुख्याधिकारी हेमंत ढोकळे व सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी यांनी तातडीने घटनास्थळी येऊन याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून आपले म्हणणे त्यांच्यापर्यंत पोचवण्याची हमी खोतमळा व कापडगाव येथील ग्रामस्थांना दिल्यावर त्या वृद्धाचा अंत्यविधी रात्री उशिरा येथे करण्यात आला. नगरसेवक राजेंद्र डोईफोडे यांनी या वृद्धाच्या अंत्यविधीचा संपूर्ण खर्च केला. दरम्यान, जिल्हाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा नगरसेविका दीपाली क्षीरसागर यांनी खोतमळा व कापडगाव ग्रामस्थांच्या वतीने दिला आहे.

खोतमळ्यातील स्मशानभूमीत लोणंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 56 गावांतील बाधित मृतांचे अंत्यविधी करण्याचा निर्णय योग्य नाही. ओढ्याच्या अलीकडे खोतमळा, तर पलीकडे कापडगाव आहे. मोठी लोकवस्ती व रहदारी असल्याने येथे कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे. 
सचिन शेळके, नगराध्यक्ष


त्यांनी ठेवले व्हॉटस्‌ऍप स्टेटस, वादांमुळे 56 जणांवर गुन्हा दाखल; 32 जणांना अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Assembly Election 2024 Result : साडेपाच हजार मतदारांनी वापरला ‘नोटा’; 3 मतदारसंघांत 106 जणांची पोस्टलमधून नकारघंटा

Kung Fu Pandya! हार्दिक पांड्याचा ट्वेंटी-२०त भीमपराक्रम; असा विक्रम करणारा पहिला भारतीय

Nashik Assembly Election 2024 Result : बंडखोर, मातब्बर अपक्षांना मतदारांनी नाकारले

Viral Video : आत्तेभावाच्या साखरपुड्याच्या पडता पडता वाचली करिष्मा ; पापाराझींना म्हणाली "वो मत डालना"

Kagawad Accident : लग्नासाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला; कार अपघातात दांपत्य ठार, दोन मुलं कोसळली नाल्यात

SCROLL FOR NEXT