Women's wrestling sakal
सातारा

Satara : लोकसहभागातून महिला कुस्ती संकुल

शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त कौशल्या वाघ-पाटील; एक कोटी खर्चून रायगावात उभारणी

सकाळ डिजिटल टीम

शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त कौशल्या वाघ-पाटील; एक कोटी खर्चून रायगावात उभारणी

ओगलेवाडी : कुस्तीप्रेमींनी एकत्रित येत शामगाव (ता. कऱ्हाड) जवळील रायगावमध्ये लोकसहभाग व परिसरातील ग्रामस्थांच्या सहकार्याने सुमारे एक कोटी रुपये खर्चाचे मुलींसाठी मुलींनी पुढाकार घेऊन विकास नावाचे महिला कुस्ती संकुल उभारले आहे. त्याद्वारे महाराष्ट्र व भारतासाठी असामान्य दर्जाच्या महिला कुस्तीगीर बनवायच्या आहेत, अशी माहिती कुस्ती संकुलाच्या संस्थापक व शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या पैलवान कौशल्या वाघ-पाटील यांनी येथे दिली.

येथील राज्यस्तरीय महिला कुस्ती स्पर्धेच्या उद्‌घाटनास त्या येथे आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी कुस्ती संकुलाची माहिती दिली. पैलवान वाघ-पाटील म्हणाल्या, महिला कुस्ती संकुलात महिला पैलवानांच्यासाठी सकस आहार, उत्तम निवास व्यवस्था, आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, नैसर्गिक वातावरणात पाल्यांचा सर्वांगीण विकास व क्रीडा कौशल्याच्या वाढीवर भर, योगासने, संरक्षणाचे धडे व करिअरविषयक मार्गदर्शन केले जात आहे.

पैलवान वाघ-पाटील या महाराष्ट्राची पहिल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर रौप्यपदक मिळवणाऱ्या राज्यातील महिला आहेत. त्यांनी राष्‍ट्रीय पातळीवर सलग पाच वेळा सुवर्ण धडक मारली आहे. नॅशनलला सलग १४ पदके मिळवण्याचा मान मिळवला. पुरुष मल्लाशी तब्बल ४५ मिनिटे लढाही त्यांनी दिला आहे.

वाघिणीची मजबूत पकड...

कौशल्या यांच्यासाठी आई-वडील व भावाने खूप हाल-अपेष्टा सोसून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाची कुस्तीगीर बनवले. ४८ किलो वजन गटात कौशल्या सलग पाच वेळा नॅशनल चॅम्‍पियन ठरल्या आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी सलग १२ पदकांची कमाई केली. दोन्ही गुडघे आणि खांद्यावर एकूण पाच मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. कौशल्या यांच्या अंगी असलेले कौशल्य व कुस्तीची वाघिणीची मजबूत पकड हा त्यांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे. महिला कुस्ती संकुलासाठी खासदार संजय पाटील, माजी मंत्री विश्वजित कदम, आमदार अरुण लाड, संग्राम देशमुख, आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: आदित्य ठाकरे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT