कुस्‍ती! sakal
सातारा

सातारा : आईच्‍या दुधावरच कुस्‍ती!

जुन्या आठवणींत शिवाजी वाघमोडे रमले; कुस्तीशी इमान आजही कायम

सकाळ वृत्तसेवा

सातारा: कुठंबी महाराष्‍ट्र केसरी असू दे, जातोच. मीदेखील ३० वर्षे पैलवानकी केली, कुस्‍त्‍या केल्‍या; पण त्‍या आईने पाजलेल्‍या दुधावरच... माळशिरसचे शिवाजी वाघमोडे हे ६५ वर्षीय कुस्तीगीर बोलत होते.येथे महाराष्‍ट्र केसरीच्‍या स्‍पर्धेला सुरुवात झाली असून त्‍यात सहभागी होण्‍यासाठी तसेच येथील मैदानात होणाऱ्या कुस्‍त्‍या पाहण्‍यासाठी राज्‍यभरातील कुस्‍तीशौकिन दाखल होत आहेत. अशाच दाखल झालेल्‍यांत शिवाजी वाघमोडे यांचा समावेश आहे.

तीन बटनी शर्ट, लेंगा, डोक्‍यावर पैलवानी बाजाची पांढरी शुभ्र टोपी, कानाच्‍या पाळ्या फुगलेल्‍या अशी त्‍यांची शरीरयष्‍टी. शरीरयष्‍टीला साजेशी भाषा आणि आब. कुस्‍तीबाबत बोलते केल्‍यावर पैलवान शिवाजी वाघमोडे म्‍हणाले, ‘‘गाव माळशिरस. घरी शेती. शिक्षणाचा पत्ता नाही. लहानपणीच पंढरपूर गाठले. एका महाराजांच्‍या संगतीत पाच वर्षे काढली. एकाच ठिकाणी राहून कंटाळा आल्‍याने रेल्‍वेने मिरज गाठले. मिरजेत आठ, दहा दिवस मिळेल ती कामे व तिथून सांगली गाठत सरकारी तालमीत जाऊन धडकलो. त्‍यावेळचे वय माहीत नाही; पण त्‍या पोराएवढा असेन. (मैदानात आलेल्‍या सुमारे १० ते १२ वर्षे वयाच्‍या मुलाकडे बोट दाखवत). जोर काढता येत नव्‍हता, मेहनत लय लांब. हळूहळू सरावलो. जोर काढाय, मेहनत करायला लागलो. घराकडून काही येण्‍यासारखे नसल्‍याने इतरांच्‍या खुराकावरच गुजराण सुरू होती. त्‍या तालमीत सांगलीतील नामांकित पैलवान संभाजीराव पवारदेखील यायचे. असाच आखाडा एकदा सांगलीच्‍या राजवाड्यात भरला होता.

लाल मातीनेअनेकांना लय दिलं!

त्‍याकाळी सर्वांचेच उत्‍पन्न कमी. खायची आबाळ; पण सगळीच पोरं अंगापिंडानं मजबूत. अशीच पोरं तालमीचा रस्‍ता पकडायची. ह्याच्‍या त्‍याच्‍या मदतीने तालमीत मेहनत करायची आणि लाल मातीत रमायची. याच लाल मातीने अनेकांना नाव मिळवून दिले. ज्‍याला खायला मिळत नव्‍हतं, त्‍याला भरपूर खुराक दिला. ज्‍याची ऐपत नव्‍हती, त्‍याच्‍या दहा-दहा मजली इमारती झाल्‍या, अनेकांची गाड्या-घोडी झाली, असे सांगत वाघमोडेंनी नव्‍याने कुस्‍तीक्षेत्रात येणाऱ्या पिढीला लाल मातीशी इमान राखण्‍याचा सल्‍ला दिला.

अंदाजे ३० वर्षे तालमीत होतो. पण, तालमीच्‍या नावाला बट्टा लागू दिला नाही. नाव कमवायला तालमीत पिढ्यान्‌ पिढ्या खपतात, आपल्‍या

एका चुकीमुळे त्‍याला बट्टा नको म्‍हणून लय काळजीनं वागलो.

- शिवाजी वाघमोडे, कुस्तीगीर, माळशिरस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT