केळघर (जि. सातारा) : केळघर घाटातील काळा कडा येथे बुधवारी रात्री झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. देवरुख आगाराचे चालक मयूर पावनिकर (वय ४०), रामकिशन केंडे (वय ४२) असे जखमींची नावे आहेत. घटनास्थळी मेढा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने, महाबळेश्वरचे आगार व्यवस्थापक नामदेव पतंगे , स्थानक प्रमुख किरण धुमाळ, कार्यशाळा कर्मचारी महाबळेश्वर आगार, मेढा आगार व्यवस्थापक सुजित घोरपडे यांनी तातडीने भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
हा अपघात झाल्यानंतर मुकवली माची येथील प्रकाश खुटेकर, विठ्ठल खुटेकर, सर्जेराव खुटेकर, बाळू खुटेकर, सुनील खुटेकर, रेंगडी येथील भरत कासुर्डे यांच्यासह ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना दरीतून वर काढले. केळघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोचल्याने जखमींना पुढील उपचारासाठी सातारा येथे खासगी रुग्णालयात वेळेत नेता आले.
स्वीडनच्या स्कॅनियाने बस करारासाठी भारतीय अधिका-यांना दिली ‘लाच’; वाहनाच्या कागदपत्रांत केला फेरफार
मेढा पोलिस ठाण्यातून व घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री दहा ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी आगाराची मालवाहतूक बस क्रमांक (एम. एच. २० बी. एल ०४२९) माणगावहुन कलिंगडे भरून सांगलीकडे चालली होती. केळघर घाटात ही बस रात्री दहा वाजण्याच्या सुमारास रेंगडी गावच्या हद्दीत काळा कडा येथे एका अवघड वळणावर आली असता चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने व बसवरील नियंत्रण सुटल्याने बस अंदाजे ५०० फूट खोल दरीत कोसळली.
या अपघातात मालट्रकवर काम करणाऱ्या चालकांपैकी एका चालकाने दरीतून वर येऊन मार्गावरील इतर वाहने थांबून अपघाताची कल्पना दिली. स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदत केल्याने या चालकांचे प्राण वाचले. यामुळे या चालकांना वेळेत उपचार मिळाले. आज (गुरुवार) घटनास्थळी विभाग नियंत्रक सागर पळसुले, विभाग यंत्र अभियंता श्री. मोहिते यांनी भेट देऊन अपघाताची सविस्तर माहिती घेतली. या अपघाताची नोंद मेढा पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अमोल माने करत आहेत.
सातारा : एसटी महामंडळाची मुंबई-पुणेकरांसाठी खुशखबर
बांधकाम विभागाने लक्ष द्यावे
बुधवारी रात्री चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला आहे.काळा कडा येथे असणाऱ्या या वळणाचा अंदाज नव्याने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना येत नाही .त्यामुळे येथे अपघातांचे प्रमाण वाढू लागले आहे. या परिसरात यापूर्वी ही मोठे अपघात झाले असून या अवघड वळणावर अजूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने संरक्षक कठडे उभारले नाहीत. या ठिकाणी संरक्षक कठडे उभारण्याची आवश्यकता आहे.अजून किती अपघात झाल्यानंतर बांधकाम विभागाला जाग येईल असा सवाल वाहनचालकांनी उपस्थित केला आहे.
काेणी काेणाचं नसतं! ग्रामस्थांनी खाेट ठरवत माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे दाखवून दिलं
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.