सातारा

कऱ्हाडला मुंगसाच्या केसांपासून बनवलेले १७३५ ब्रश जप्त

पाच व्यावसायिकांना अटक

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हा़ड : येथील वन विभागाने पाच वेगवगेळ्या पेन्टसच्या दुकानात छापे टाकून मुंगूसाच्या (mongoose) केसांपासून बनवलेले पेंटींग ब्रश जप्त केले. वन विभागाने केलेल्या धडक कारवाईत तब्बल एक हजार ७३५ पेंटींग ब्रश जप्त केले आहेत. त्या प्रकरणी पाच दुकानदरांनाही अटक झाली आहे.

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार एकाचवेळी टाकलेल्या छाप्यात एक हजार ७३५ ब्रश जप्त आहेत. त्यात शिवानी पेंट्सचे राजेंद्र सुपनेकर (वय ३७, रा. मलकापूर), देवकर पेंट्सचे संदीप देवकर (४५ 45 रा. शनिवार पेठ), सनशाईन पेंट्सचे तोहीम शेख (३९, रा. वघेरी), भारत पेंट्सचे नविद वाईकर ( २४, रा. कऱ्हाड ) व सह्याद्री पेंट्सचे अखतर वाईकर (५१, रा. कऱ्हाड) यांना अटक झाली आहे.

शहरातील विविध रंगाच्या व्यवसायिकांच्या दुकानावर एकाच वेळी वनविभागाने छापा टाकून मुंगूसाच्या केसांपासून बनवलेले ब्रश मोठ्या प्रमाणावर जप्त केले आहेत. मंगुसाच्या केसापासून बनवलेले ब्रशची विक्री होत अशल्याची गोपनीय माहिती वन विभागाला मिळाला होती. त्यानुसार वनविभाग व वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो यांनी संयुक्तपणे कारवाई केली. कऱ्हाड शहर व मलकापूरातील पाच दुकानांवर एकाचवेळी छापे टाकण्यात आले. त्यावेळी एक हजार ७३५ ब्रश जप्त झाले. त्यात शिवानी पेंट्स मधून ९२, देवकर पेंट्स मधून ४४७, सनशाईन पेंट्स मधून २१२, भारत पेटस् मधून १६३ आणि सह्याद्री पेंट्स मधून ८२१ ब्रश जप्त झाले. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कायद्यातंर्गत मुंगूसाला संरक्षण आहे.त्याच्या केसांपासून बनवलेले ब्रश मोठ्या प्रमाणात सापडले आहे. ब्रश जप्त करून पाचही दुकानदारांना अटक झाली आहे. मुंगूसाच्या केसांपासून बनवलेले ब्रश जप्त केले आहेत. उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे व पथकानेकरावई केली.

त्यात वनाधिकारी तुषार नवले, विजय नांदेश्वर व संदीप येवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, ए. पी. सावखंडे, डी. डी. जाधव, बी. बी. कदम वनरक्षक रमेश जाधवर, दत्ता जाधव, अरुण सोळंखी, उत्तम पांढरे, अश्विन पाटील, शंकर राठोड, सुभाष गुरव, सविता कुट्टे, दीपाली अवघडे, पूजा परुले, पूजा खंडागळे, शीतल पाटील, संतोष यादव, अरविंद जाधव यांनी सहभाग घेतला.

मुंगूस वन्यजीव आहे. तो निसर्ग साखळीत महत्वाचा आहे. या निरुपद्रवी प्राण्यास मारून त्याच्या कातडी व केसांपासून ब्रश बनवतात. ते ब्रश रंगारी, आर्टिस्ट वापरतात तरी सदर ब्रश बाळगणे व त्याची विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार मुंगूस शेड्युल दोनच्या भाग दोन येतो.

- महादेव मोहिते उपवनसंरक्षक सातारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT