Pandharpur Ashadhi Wari esakal
सातारा

मानाच्या दहा पालख्यांत साताऱ्याच्या पाच विणेकरांचा समावेश

सकाळ डिजिटल टीम

सातारा : सध्या कोरोना संक्रमणाच्या काळात यंदाच्या आषाढी पायीवारीसाठी (pandharpur ashadhi wari) सरकारने (maharashtra government) वारीवर निर्बंध घातले असून केवळ मानाच्या दहा पालख्यांना काही निर्बंध घालत एसटीने पालखी न्यायला परवानगी दिलीय. यामध्ये वारकऱ्यांच्या संख्येत सुद्धा मर्यादा घालण्यात आलीय. शासनाचा हा आदेश मान्य करीत दहाही संस्थानांनी नैतिक मूल्यांची जपणूक करुन वारकरी सांप्रदाय (Warkari sampradaya) हा सहिष्णुता जपणारा व कायद्याचा सन्मान राखणारा आहे हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविले आहे. (Selection Of Bhagwan Dagdu Khare From Bhuinj For Pandharpur Ashadhi Wari By The Government Satara Marathi News)

सध्या कोरोना संक्रमणाच्या काळात यंदाच्या आषाढी पायीवारीसाठी सरकारने वारीवर निर्बंध घातले आहेत.

त्या अनुषंगाने देहू देवस्थान समितीने सोहळ्यातील ३६० दिंड्यांपैकी फक्त ६० दिंड्यांच्याच विणेकऱ्यांना निमंत्रित केले आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील ५ दिंड्यांच्याच विणेकऱ्यांना बहुमानाने निमंत्रित केल्याचे देवस्थानचे विश्वस्त, तुकोबारायांचे वंशज हभप माणिक महाराज मोरे यांनी जाहीर केले. त्यात सातारा येथील ३० वर्षांची अखंड परंपरा असणाऱ्या जय हनुमान दिंडी नं. ७० या दिंडीला मान मिळाला असून दिंडी मालक हभप रामचंद्र नलावडे, चालक हभप संजय महाराज कणसे, चोपदार हभप उमेश महाराज देशमुख आटपाडीकर, विश्वस्त हभप नाना निकम सातवेकर, कौलवकर वारकरी मंडळी, चंद्रकांत पवार (चिपळूण), हभप भीमराव बंडगर, सांगली-लातूर विभाग वारकरी मंडळ, विशाल मोहिते, विश्वास पांढरे, नवनाथ कदम, नंदू पाटील, शिरढोणकर वारकरी समाज, पिराचीवाडीकर वारकरी भजन मंडळ, तर भुईंज येथील हभप भगवान दगडू खरे (महाराज) (Bhagawan Dagdu Khare Maharaj) यांची दिंडीचे मार्गदर्शक ज्येष्ठ कीर्तनकार हभप डॉ. सुहास महाराज फडतरे (Dr. Suhas Maharaj Phadtare) यांच्या सूचनेनुसार विणेकरी म्हणून निवड करण्यात आलीय.

या निवडीबद्दल दिंडीतील सर्व वारकऱ्यांनी खरे यांचे अभिनंदन केले. तसेच भुईंज परिसरातील वारकरी लोकांनीही या निवडीबद्दल समाधान व्यक्त करीत त्यांना वारीसाठी शुभेच्छा दिल्या. सलग २९ वर्षे विणेकरी म्हणून सेवा देणारे दिंडीचे निष्ठावंत विणेकरी हभप निवृत्ती चव्हाण पिराचीवाडीकर यांना त्यांच्या वयाचा विचार करुन सन्मानाने सेवामुक्त करण्यात आले. खरे महाराज विणेकरी १ तारखेला वारीसाठी प्रस्थान ठेवणार असून दिंडीतील भजन मंडळही देहू येथे भजनासाठी उपस्थित राहणार आहेत.

Selection Of Bhagwan Dagdu Khare From Bhuinj For Pandharpur Ashadhi Wari By The Government Satara Marathi News

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT