Samindra Jadhav esakal
सातारा

राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी समिंद्रा जाधव; खासदार सुळेंकडून उत्कृष्ट कामाची दखल

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्याच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी नुकत्याच करण्यात आल्या.

उमेश बांबरे

सातारा : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षपदाचा कार्यकाल संपल्याने समिंद्रा जाधव यांची राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांत महिला जिल्हाध्यक्षा म्हणून केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचीही निवड केली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्याच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी नुकत्याच करण्यात आल्या. त्यामध्ये सौ. जाधव यांना प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या हस्ते नियुक्तिपत्र देण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य म्हणून राजकारणात प्रवेश केलेल्या जाधव यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासाठी दिलेला वेळ, पक्ष संघटन मजबुतीसाठी केलेले कार्य लक्षात घेऊनच त्यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदावर वर्णी लागली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा म्हणून जाधव यांच्याकडे पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवरांनी जबाबदारी सोपवली होती.

जिल्हाध्यक्षपदाच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी पक्ष तळागाळातील महिलांपर्यंत पोचविण्याचे काम केले. महिलांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्राधान्याने पुढाकार घेऊन त्यांना मूळ प्रवाहात आणण्याचे काम त्यांनी केले. युती सरकारच्या विरोधात त्यांनी विविध विषयांवर आंदोलन करून आवाज उठवला होता. त्यांच्या या कामाची दखल घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश पातळीवर सरचिटणीस या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या हस्ते नियुक्तिपत्र देण्यात आले. या वेळी माजी खासदार आनंद परांजपे उपस्थित होते. या निवडीबद्दल त्यांचे खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, खासदार श्रीनिवास पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने आदींनी अभिनंदन केले आहे.

Edited By : Balkrishna Madhale

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दुसऱ्या फेरी अखेर माहीममध्ये अमित ठाकरे पिछाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT