सातारा : कोविड रुग्णांसाठी सध्या काम सुरू असलेल्या जम्बो हॉस्पिटलची टेंडर प्रक्रिया सुरू आहे. 52 कोटी रुपयांच्या या हॉस्पिटलसाठी नऊ विविध टेंडर काढण्यात आली आहेत. त्यापैकी ऑक्सिजन पाइपलाइनचे केवळ एकच टेंडर आतापर्यंत मंजूर झाले आहे. त्यामुळे उर्वरित आठ टेंडर प्रक्रिया होऊन त्यातील पूर्तता झाल्यावरच या हॉस्पिटलचे उद्घाटन होणार आहे. यामध्ये मनुष्यबळ उपलब्ध करणाऱ्या "एचआर'च्या टेंडरला इतर जिल्ह्यात प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे साताऱ्यात मनुष्यबळ उपलब्ध होणार का, हेही महत्त्वाचे आहे. सध्या जिल्ह्यात रुग्णांना बेड कमी पडत असताना शासनाने जम्बो हॉस्पिटल टेंडर प्रक्रियेत अडकू नये, याची दखल आता जिल्हा प्रशासनाने घेणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग प्रचंड वाढलेला आहे. आता एक हजार रुग्ण दररोज बाधित आढळत आहेत. त्यामुळे या रुग्णांना उपचारासाठी शासकीय तसेच खासगी रुग्णालयांतही बेडची कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जम्बो हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी छत्रपती शिवाजी संग्रहालयात त्याची मांडणी करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. एकूण 52 कोटी रुपयांच्या या हॉस्पिटलमध्ये 52 आयसीयू बेड व 234 ऑक्सिजन बेडची सुविधा होणार आहे. त्यासाठी तब्बल नऊ प्रकारची टेंडर काढण्यात आलेली आहेत. यामध्ये मनुष्यबळासह ऑक्सिजन, आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरसह इतर सुविधा देणे, स्वच्छता, लॉन्ड्री आदींचा समावेश आहे. आतापर्यंत नऊपैकी एका टेंडरला मंजुरी मिळाली आहे. हे ऑक्सिजन पाइपलाइन बसविण्याचे टेंडर असून, ते सुमारे सव्वादोन कोटी रुपयांचे आहे.
कांदा निर्यातबंदीबाबत भाजप खासदार उदयनराजे आक्रमक!
सर्वांत महत्त्वाचे टेंडर मनुष्यबळ पुरविणे म्हणजेच एचआर विभागाचे आहे. यातूनच हॉस्पिटलसाठी डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय आदी यंत्रणा पुरविल्या जाणार आहेत. सध्या बाहेरच्या जिल्ह्यात जम्बो हॉस्पिटलसाठी मनुष्यबळाची सुविधा उपलब्ध होण्यात प्रचंड अडचणी येत आहेत. त्यामुळे साताऱ्यातील हॉस्पिटलसाठी या टेंडरला प्रतिसाद मिळणार का, हा प्रश्न आहे. जम्बो हॉस्पिटलसाठी 52 डॉक्टर्स, 250 नर्सेससह इतर स्टाफ लागणार असून, तीन शिफ्टमध्ये या हॉस्पिटलचे कामकाज चालविले जाणार आहे. अद्याप उर्वरित सात टेंडरची प्रक्रिया होऊन त्या सुविधा उपलब्ध होईपर्यंत बराच कालावधी जाणार आहे. कोरोना संसर्गाने उच्चांक गाठलेला असताना जम्बो हॉस्पिटल सुरू होण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आरोग्य विभागापुढे वाढत्या रुग्णसंख्येवर उपचार कोठे करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्यांची आर्थिक क्षमता आहे, असे कोरोनाबाधित रुग्ण खासगी रुग्णालयात जात आहेत. पण, आता तेथेही बेड मिळत नाहीत.
खुशखबर! प्लाझ्मा थेरपीसाठी कृष्णा हॉस्पिटलला मान्यता; गंभीर कोरोनाबाधित रुग्णांचा जीव वाचण्यास होणार मदत
एखादा रुग्ण बाधित झाला आणि त्याला तातडीने उपचाराची गरज असल्यास बेड शोधण्यातच वेळ जात आहे. अशावेळी तातडीने उपचार मिळत नसल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू होत आहे. काही वेळेस केवळ उशिरा बेड मिळाल्यामुळेही रुग्ण दगावत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जम्बो हॉस्पिटल टेंडर प्रक्रियेत जास्त दिवस अडकवून न ठेवता तातडीने निर्णय घेऊन किमान आयसीयू बेड तरी सुरू करावेत, अशी अपेक्षा सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.
एसपींचा पुढाकार, साताऱ्यात पोलिसांसाठी कोविड हॉस्पिटल साकार!
...असे आहे सातारचे जम्बो हॉस्पिटल
आयसीयू बेड : 52
ऑक्सिजन बेड : 234
खर्च : 52 कोटी रुपये
एकूण टेंडर : नऊ
आतापर्यंत मंजूर टेंडर : एक
आवश्यक स्टाफ :
डॉक्टर्स : 52
नर्सेस : 250
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.