Satara 
सातारा

गावभेटी, रोडशो झाले; पण कोरोनावर उपाययोजना शून्य!

जालिंदर सत्रे

पाटण (जि. सातारा) : कोरोनाचा फैलाव तालुकाभर पसरला आहे. रुग्णांची संख्या 184 झाली असून तालुक्‍याला पुन्हा दहा दिवसांच्या लॉकडाउनला सामोरे जायची वेळ आली आहे. कोरोना रुग्ण सापडला की, त्या गावाला भेटी देण्याचा सपाटा नेतेमंडळींनी लावला असला तरी कोरोना रोखण्यासाठी उपाययोजनांचा मात्र ठणठणाट पाहावयास मिळत आहे. आढावा बैठका, गावभेटी या रोडशोचा परिणाम आकडा कमी करण्यासाठी झालेला नाही. राजकारण सोडून कोरोनामुक्त तालुका होण्यासाठी नेतेमंडळी कडक उपाययोजना राबविणार आहेत की नाही, असा सवाल जनतेतून व्यक्त होत आहे. 

गेले चार महिने प्रशासन कोरोनाशी दोन हात करत असले तरी चाकरमान्यांमुळे कोरोनाने तालुकाभर हातपाय पसरलेत. तालुक्‍याची मुख्य बाजारपेठ असणाऱ्या पाटण शहरात अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी व व्यापाऱ्यांसह जनतेने केलेले प्रयत्न कोरोनाचा शिरकाव रोखू शकलेले नाहीत. आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 184 झाली असून, विलगीकरण कक्षात 143 जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोनावर मात करून 102 रुग्णांनी घर जवळ केले असले तरी नऊ जणांचा मृत्यू व 73 जण कऱ्हाडला कोरोनाशी लढत आहेत. 

कोणत्याही गावात कोरोना रुग्ण सापडला की राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर धाव घेऊन पाहणी करीत आहेत. मंत्र्यांबरोबर वाहनांचा ताफा, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिस अधिकारी, आरोग्य अधिकारी, तर सत्यजितसिंह पाटणकरांबरोबर सभापती राजाभाऊ शेलार आणि गटविकास अधिकारी असा लवाजमा असतो. त्यांनी भेटी द्यायलाही हरकत नाही. पण, त्याबरोबर दोन्ही नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना लोकांना जागृक करण्यासाठी कामाला लावले असते तर त्याचा निश्‍चित चांगला उपयोग झाला असता. 

वाढलेला आकडा दोन्हीही नेते रोखू शकलेले नाहीत. फक्त कोरोना रुग्ण सापडला की गावभेटीचा "रोडशो' होतो व पुन्हा सर्वकाही विसरल्यासारखे. विधानसभा निवडणुकीसाठी गावपातळीवर दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांची गावागावांत मजबूत फळी आहे. राजकीय श्रेयवादाच्या गप्पा मारणारे व दोन्ही नेत्यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून मिरविणाऱ्यांवर दोन्ही नेत्यांनी गावपातळीवर निवडणुकीसारखी जर जबाबदारी दिली असती तर कोरोनाला मागेच पायबंद बसला असता. चार महिन्यांत बाहेरून आलेले गोरगरीब 14 दिवस सार्वजनिक इमारतीत अथवा स्वतःच्या घरात होम क्वारंटाइन करून घेत होते. मात्र, नेत्यांच्या जवळ पहिल्या व दुसऱ्या फळीतील कार्यकर्ता अशी ओळख असणारांच्या घरातील अथवा नातलग खुलेआम फिरत होते. 


...त्यापेक्षा कार्यकर्त्यांकडून जनजागृती करा 

दोन शतकापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढत आहे. कोरोना झालेल्या गावाला भेटी देऊन रोडशो करण्यापेक्षा या नेत्यांनी कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी प्रयत्न केले असते तर आज दहा दिवसांच्या कडक लॉकडाउनला सामोरे जाण्याची वेळ आली नसती. निवडणुकीत असणारी स्थानिक यंत्रणा नेतेमंडळींनी विधानसभा निवडणुकीसारखी कामाला लावली तर काही दिवसांतच तालुका कोरोनामुक्त होईल, हे सांगण्यासाठी भविष्यवेत्याची गरज लागणार नाही. 

संपादन : पांडुरंग बर्गे 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

0.05 सेकंद, 2 सेंटीमीटर... Trump यांच्यावर गोळीबार; अमेरिकेच्या निवडणुकीचा टर्निंग पॉइंट कसा ठरला?

Supreme Court : तुमच्याकडे कारचे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर... सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; अनेकांना होणार फायदा

लग्नाच्या १३ वर्षांनंतरही मुल का नाही? सतत एकच प्रश्न विचारणाऱ्यांना प्रिया बापटचं रोखठोक उत्तर, म्हणाली- मी आता..

'या' दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला! कांटे की टक्कर अन् काटाजोड लढती; कोल्हापुरातील 'या' दहा मतदारसंघांत काय स्थिती?

Donald Trump Visits Pune: डोनाल्ड ट्रम्प सुद्धा आहेत पुणेकर! जेव्हा फ्लॅट बघण्यासाठी आले अन् उभं केलं ट्रम्प टॉवर

SCROLL FOR NEXT