Shambhuraj Desai vs Aditya Thackeray esakal
सातारा

आदित्य ठाकरेंच्या सभेनंतर शंभूराज देसाईंचं रविवारी शक्तिप्रदर्शन; सभेकडं जिल्ह्याचं लक्ष

देसाईंच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांची मल्हारपेठ इथं जाहीर सभा झाली होती.

सकाळ डिजिटल टीम

देसाईंच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांची मल्हारपेठ इथं जाहीर सभा झाली होती.

कऱ्हाड : कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्यानंतर ‌शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) रविवारी (ता. १४) प्रथमच मतदारसंघात येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार तयार केली आहे. युवा सेनेचे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची मल्हारपेठ येथे जाहीर सभा झाली होती. त्यांच्यानंतर मंत्री देसाई यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे त्यांच्या शक्ती प्रदर्शनाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

पाटण विधानसभा मतदारसंघात (Patan Assembly Constituency) मंत्री देसाई यांचे कऱ्हाड तालुक्यातील वारुंजी फाटा येथून लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यापर्यंत (Balasaheb Desai Sugar Factory) ठिकठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने गाड्यांची रॅलीही होणार आहे. त्यानंतर दौलतनगरला जाहीर सभा होणार आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्हा परिषद गणात नियोजनासाठी बैठकीचे कार्यकर्त्यांनी आयोजन केले‌ आहे. विजयनगर सुपने ते मरळी कारखाना या दरम्यान प्रत्येक गावात मंत्री देसाई यांचे स्वागत करण्यात येणार आहे.

मंत्रिपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच देसाई येत असल्याने कार्यकर्त्यांत उत्साह आहे. तालुक्यात स्वागताचे बॅनर्स तयार करण्याच्याही हालचाली सुरू झालेल्या आहेत. कारखाना कार्यस्थळावर जाहीर सभेचे नियोजन करण्यात आले आहे. देसाई यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने पाटण तालुक्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे. आदित्य ठाकरे यांची मल्हारपेठ येथे जाहीर सभा झाली होती. या पार्श्वभूमीवर शिंदे गटात बंडखोरी केल्यानंतर प्रथमच मंत्री झालेल्या देसाई यांची‌ जाहीर सभा होणार असून, ते काय बोलणार याकडे पाटण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना तीन दिवस सुट्टी

Reliance And Diseny: अखेर झाली घोषणा! रिलायन्स-डिस्ने आले एकत्र; 70,352 कोटींचं जॉईन्ट व्हेंचर; नीता अंबानींवर अध्यपदाची जबाबदारी

Sports Bulletin 14th November: एकाच मॅचमध्ये दोघांची त्रिशतकं, गोव्याचा ऐतिहासिक विजय ते चॅम्पियन्स ट्रॉफी अपडेट्स

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT