Shambhuraj Desai  sakal
सातारा

Shambhuraj Desai : स्वर्गीय आनंद दिघे यांच्या मृत्यूबद्दल शंका घेण्यास वाव - मंत्री शंभूराज देसाई

हेमंत पवार

कराड : स्वर्गीय आनंद दिघे यांचे निधन झाल्यापासून प्रत्येकाच्या मनात शंका होती. काही तासानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार होता. मात्र काही तासात अचानक त्यांचा मृत्यू झाला. आमचे विधिमंडळातील सहकारी संजय शिरसाठ यांनी जी शंका उपस्थित केली आहे ते पाहता यात शंका घ्यायला वाव आहे असे मत व्यक्त करत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आमदार संजय शिरसाठ यांच्याकडून स्वर्गीय आनंद दिघे यांच्या मृत्यूबद्दल करण्यात आलेल्या दाव्यास समर्थन दिले.

अजित पवार यांना बदनाम करण्याचा जितेंद्र आव्हाड यांचा केविलवाणा प्रयत्न आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या सभेला लोक जमत नाहीत. तेच जितेंद्र आव्हाड आज आरोप करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय व्यक्तिमत्व पाहिल्यास आणि त्यांची राजकीय कारकीर्द पाहिल्यास एक स्पष्ट वक्ता नेता म्हणून त्यांची ओळख आहे.

नेहमीच त्यांच्या सभांना गर्दी होते आणि आजही त्यांच्या सभांना गर्दी होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पैसे वाटून लोकांना सभेला आणण्याची वेळ कधीही येणार नाही. अपुऱ्या माहितीच्या आधारे आणि केवळ अजित पवार यांना बदनाम करण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे, असेही मंत्री देसाई यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs BAN, Test: ऑन कॅमेरा राजीव शुक्ला अलर्ट! मॅच पाहताना होते रिलॅक्स पण घडलं असं काही की...

Maratha Reservation: कुणबी दाखले मिळवतानाच्या अडचणी आता कमी होणार! शिंदे समितीच्या अहवालावर निघणार जीआर

ऑनलाइन फोन मागवला, ऑर्डर द्यायला आलेल्या डिलिव्हरी बॉयला दोघांनी संपवले, मृतदेहाचे तुकडे करून फेकले, कारण काय?

Bigg Boss Marathi 5 : "अभिजीत अरबाजचं सॉफ्ट व्हर्जन" ; त्या भांडणाचा राग घराबाहेर पडताच पॅडीनी केला व्यक्त , "घराबाहेर येताच..."

Atal Setu: गाडी थांबवली अन् व्यक्तीची अटल सेतूवरून समुद्रात उडी, वर्षभरातील चौथी घटना

SCROLL FOR NEXT