Shambhuraj Desai esakal
सातारा

Satara : साखर उताऱ्यात पालकमंत्र्यांचा कारखाना आघाडीवर; 15 कारखान्यांत 30 लाख 70 हजार क्विंटल साखरेची निर्मिती

आतापर्यंत कारखान्यांनी ३४ लाख ६३ हजार ५२ टन उसाचे गाळप केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येक वर्षी गाळप, साखर निर्मितीत जिल्ह्यात आघाडीवर असलेला जरंडेश्वर कारखाना थोडा मागे पडल्याचे चित्र आहे.

सातारा : जिल्ह्यातील ऊस गळीत (Sugarcane Rate) हंगाम निम्म्यावर आला असून, आतापर्यंत खासगी व सहकारी साखर कारखान्यांनी मिळून ३४ लाख ६३ हजार ५७ टन उसाचे गाळप करून तीस लाख ७० हजार ३४० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. सरासरी साखर उतारा ८.८३ असला तरी सहकारी साखर कारखान्यांना (Sugar Factory) यावर्षी चांगला साखर उतारा मिळत असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात यावर्षी उसाचे क्षेत्र कमी असल्यामुळे शेतकरी (Farmer) आपला ऊस लवकरात लवकर कसा जाईल, याकडे लक्ष ठेऊन आहे. जिल्ह्यातील सात खासगी व आठ सहकारी साखर कारखाने गाळप करत आहेत. बहुतांशी कारखान्यांनी आपली क्षमता वाढवली आहे. दररोज ८२ हजार २०० टन क्षमतेने कारखाने गाळप करत आहेत.

आतापर्यंत कारखान्यांनी ३४ लाख ६३ हजार ५२ टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून ३० लाख ७० हजार ३४० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. सर्वांत जास्त गाळप कृष्णा कारखान्याचे झाले असून, त्यांनी पाच लाख १८ हजार २६० टन उसाचे गाळप केले असून, चार लाख ८० हजार ५६० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे.

पालकमंत्र्यांचा कारखाना आघाडीवर

साखर उताऱ्यात पालकमंत्र्यांचा बाळासाहेब देसाई साखर कारखान्याने (Balasaheb Desai Sugar Factory) आघाडी घेतली आहे. त्यांना ११.०२ टक्के साखर उतारा मिळाला आहे. प्रत्येक वर्षी गाळप, साखर निर्मितीत जिल्ह्यात आघाडीवर असलेला जरंडेश्वर कारखाना थोडा मागे पडल्याचे चित्र आहे.

गाळप स्थिती..

कारखानानिहाय गाळप टनात व कंसात साखरेची निर्मिती क्विंटलमध्ये : श्रीराम कारखाना १७४२७३ (१८६२५०), कृष्णा कारखाना रेठरे बुद्रुक ५१८२६० (४८०५६०), किसन वीर वाई १९१२६० (२०२१२०), लोकनेते बाळासाहेब देसाई कारखाना ७९७३० (८७९००), सह्याद्री कारखाना ३११५०० (३३१३४०), अजिंक्यतारा कारखाना २२८९१० (२३९२७०), रयत अथणी १०१२६० (९६१५०), प्रतापगड कारखाना ११३४५० (११६१५०), खंडाळा कारखाना ५३५५० (४६७००), दत्त इंडिया साखरवाडी २३९७०५ (११३१५०), जरंडेश्वर कारखाना ४१०८१० (३१६२००), जयवंत शुगर २९११४० (२६८९००), ग्रीन पॉवर गोपुज १२१३३० (१२५५५०), स्वराज्य इंडिया फलटण २१४१७२ (१३१०८०), शरयू फलटण १८०८३१ (१०६३२०).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT