सातारा

Sharad Pawar : यशवंतराव चव्हाणांसोबतचे 5 दशकापूर्वीचे छायाचित्र पाहून पवारांना झाला आनंद

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : तब्बल पाच दशकापूर्वी पुण्यात झालेल्या कार्यक्रमाचे छायाचित्र हाती पडताच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या भावना उमटल्या. रेठरे बुद्रूक येथील राष्ट्रवादीचे नेते व कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या निवासस्थानी श्री. पवार यांनी भेट दिली. त्यावेळी मोहिते कुटूंबानी १९७५ मध्ये झालेल्या कार्यक्रमाचे छायाचित्र श्री. पवार यांना भेट दिले.

तत्कालीन मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण, अविनाश मोहिते यांचे आजोबा आबासाहेब मोहिते, एम. डी. निंबाळकर आदींसह अन्य जुन्या सहकाऱ्यांसोबत तत्कालीन कृषी मंत्री शरद पवार यांचा त्या छायाचित्रात समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या जुन्या आठवणींना मिळालेला उजाळा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

राष्ट्रवादीच्या विभागणीनंतर कऱ्हाड दक्षिणेत अविनाश मोहिते यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दक्षिणेत त्यांच्या गटाला चार्ज करण्यासहीत श्री. मोहिते यांच्याशी हितगुज करण्यासाठी श्री. पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी जेवणाचाही बेत आखला होता. श्री. पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांचा काफीलाच येणार असल्याने सकाळपासून श्री. मोहिते यांच्या घरी स्थानिक नेत्यांची रिघ लागली होती.

श्री. पवार ठरलेल्या वेळेत तेथे आले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते होते. त्यात माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, पाटणचे सत्यजितसिंह पाटणकर, जिल्हाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादीच्या आयटीसेलचे सारंग पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती मानसिंगराव जगदाळे, देवराज पाटील, संगीता साळुंखे, मानसिंगराव पाटील, अॅड. रवींद्र पवार, प्राचार्य मोहन राजमाने,

सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक लालासाहेब पाटील उपस्थीत होते. श्री. पवार यांनी येताच श्री मोहिते यांच्याशी हितगुज केले. एकमेकांची चौकशी झाल्यानंतर मोहिते कुटूबियांनी श्री. पवार यांना छायाचित्र दिले. यावेळी अविनाश मोहिते, त्यांचे वडील व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जगन्नाथराव मोहिते, आई सौ. नूतन मोहिते, पत्नी अर्चना मोहिते, बंधू जयेश मोहिते, मदनराव मोहिते, अमरसिंह मोहिते यांच्यासह अन्य सदस्य उपस्थीत होते.

श्री. पवार यांना भेट दिलेले छायाचित्र पुण्यातील कार्यक्रमाचे आहे. श्री. मोहिते यांचे आजोबा आबासाहेब मोहिते यांनी कृषी विद्यापीठात महात्मा फुले यांचा पुतळा भेट दिला होता. त्याचे अनावरण तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले होते. त्या कार्यक्रमास श्री. पवारही उपस्थित होते. त्यांच्यासोबत आबासाहेब मोहिते, श्री. निंबाळकर व अन्य त्यांचे सहकारीही होते. श्री. पवार यांनी जगन्नाथ मोहिते यांना त्या छायाचित्राची माहिती विचारली. जुन्या सहकाऱ्यांसोबतच्या छायाचित्रातील जुनी आठवण पाहताच श्री. पवार यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लेकर दिसली.

मोहितेच्या पाठिशी रहा ः शरद पवार

उपस्थित नागरीकांशी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दोन मिनिटे संवाद साधला. श्री पवार म्हणाले, मोहिते कुटूबियांसह राष्ट्रवादीवर प्रेम करणाऱ्या आपल्यासारख्या लोकांमुळे आम्हाला बळ मिळते. अगदी अल्पावधीच्या भेटीसाठी मी रेठऱ्यात आलो असतानाही आपण सर्वांनी एकत्रीत येवून माझ्या स्वागतासाठी केलेल्या गर्दीमुळे मला आनंद झाला. अशाच पध्दतीने आपण सर्वजण अविनाश मोहिते व त्यांच्या कुटूंबियासोबत रहावे. श्री. मोहिते यांच्या पाठिशी राष्ट्रवादीची ताकद पूर्ण ताकदीने आम्ही उभा करत आहोत. रेठऱ्याच्या गावाला वेगळे ऐतिहासिक महत्व आहे. तो सगळा वारसा जपण्यासाठी आपण सर्वांना समर्थपणे उभे रहायचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यातील काही भागात विजांचा कडकडाटसह मुसळधार पावसाला सुरूवात

Daughters Day निमित्त अश्विन लेकींना देणार स्पेशल बॉल, पण मुलींनीच दिला नकार; पाहा Video

देवेंद्र फडणविसांची मोठी खेळी! शरद पवार गटाचा वरिष्ठ पदाधिकारी भाजपच्या ताफ्यात, रोहितदादांना धक्का

विराट कोहली - ऋषभ पंतचा मैदानात दिसला याराना, गॉगल केले अदला-बदली; Video Viral

Local Update: गोरेगाव-कांदिवली लाईनवर काम; 23 आणि 24 सप्टेंबरला 6.5 तासांचा ब्लॉक, काही गाड्या रद्द

SCROLL FOR NEXT