Sharad Pawar Reserve Bank esakal
सातारा

Sharad Pawar : 'रिझर्व्ह बँके'च्या चुकीच्या धोरणामुळे 500 हून अधिक बँका बंद पडल्या; असं का म्हणाले शरद पवार?

Sharad Pawar : देशात दोन ते तीन राज्यांनी सहकारात उठावदार कामगिरी करत आपले वेगळेपण निर्माण केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

''शिक्षणक्षेत्रात प्रचंड बदल झालेत. टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जगात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. ज्यांच्यासाठी अण्णांनी काम केले, त्यांना या आधुनिक तंत्रज्ञानापासून दूर ठेवता येणार नाही.''

सातारा : रिझर्व्ह बँकेच्या चुकीच्या धोरणामुळे पाचशेहून अधिक बँका बंद पडल्या आहेत. समाजाच्या शेवटच्या घटकांना जीवनदान देण्यासाठी कायमस्वरूपी अग्रभागी असणाऱ्या व विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अर्थसाहाय्य देणाऱ्या नागरी बँका पुढील पिढी घडविण्यासाठी टिकल्या पाहिजेत, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मांडली.

प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या (Primary Teachers Cooperative Bank) शताब्दी महोत्सवानिमित्त आज जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते- पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘देशात दोन ते तीन राज्यांनी सहकारात उठावदार कामगिरी करत आपले वेगळेपण निर्माण केले आहे. महाराष्ट्रात सहकार चळवळ नेहमीच अग्रेसर राहिली आहे. मात्र, सध्या सहकार क्षेत्र अडचणीत आणण्याचे उद्योग सुरू आहेत. अडचणीतील संस्थांना आधार देण्याऐवजी त्यांना निर्बंध लादून आणखी अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध लावावेत, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, ज्या बॅंका पुन्हा स्थिरस्थावर होऊ शकतात, त्यांना सहकार्यही केले पाहिजे.’’

महिलांच्या अनुपस्थितीमुळे पवारांच्या कानपिचक्या

शिक्षक बॅंकेच्या संचालक मंडळावर केवळ दोनच महिला आहेत, तसेच आज बँकेच्या कार्यक्रमात महिलांची उपस्थिती केवळ दहा टक्के होती. यावर शरद पवार यांनी बोट ठेवत महिलांना आरक्षण दिले नसते, तर दोन महिलाही संचालक मंडळावर दिसल्या नसत्या, असा उपरोधिक टोला लगावला. धोरणात्मक निर्णयात महिलांना संधी दिल्यास अधिक पारदर्शकता येईल, असे सांगत महिलांना संधी देण्याचे त्यांनी आवाहन केले.

‘आधुनिकतेचे व्हिजन घेऊन वाटचाल करा’

शिक्षणक्षेत्रात प्रचंड बदल झालेत. टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जगात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. ज्यांच्यासाठी अण्णांनी काम केले, त्यांना या आधुनिक तंत्रज्ञानापासून दूर ठेवता येणार नाही. रयत शिक्षण संस्था आधुनिक शिक्षणाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करेल, असा मला विश्वास आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त पवार यांनी कर्मवीर समाधीस अभिवादन केले. कर्मवीर पाटील यांनी स्वतःला शिक्षणासाठी झोकून घेतले. अण्णांचे कार्य समाजाच्या प्रगतीला पूरक ठरले आहे, असेही पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यांनी घेतला शहरी वृक्ष व्यवस्थापन कार्यशाळेत भाग

SCROLL FOR NEXT