शिरवळ (जि. सातारा) : शिरवळ पुन्हा एकदा जिल्ह्याचा कोरोना हॉटस्पॉट ठरू लागल्यानंतर शनिवारी दुपारी तातडीने तहसीलदार दशरथ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या पुढील आदेशापर्यंत शिरवळ शहर पूर्णतः बंद करण्यात आले. या वेळी अत्यावश्यक सेवा शासकीय नियमानुसार सुरू राहणार आहे. आज दुपारी मेडिकल सेवा व बॅंका वगळता सर्व व्यवहार बंद करण्यात आले.
शहरात दोनच दिवसांत कोराना रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. दरम्यान प्रशासनाकडून पूर्ण काळजी घेतली असून, राञी उशिरा शहराच्या सीमाही सील करण्यात येणार असल्याचे तहसीलदार दशरथ काळे यांनी दिली. हे शहर कंटेनमेंट झोन जाहीर केले होते. मात्र, स्थानिक नागरिक व व्यापारी यांच्या मागणीनुसार यामध्ये थोडी शिथिलता देण्यात आली. मात्र, तरीही कोरोना मीटर थांबत नसल्याने तातडीने आज दुपारी शिरवळ शहर बंद करण्यात आले. शहरात एकाच दिवशी 28 ते 32 रुग्णसंख्या आढळून येऊ लागली. तालुक्यात सर्वाधिक रुग्णसंख्या शिरवळ शहरात वाढू लागली.
कोरोनाच्या पहिल्या लाटेतही शिरवळ जिल्ह्यात हॉटस्पॉट ठरले होते. दुसऱ्या लाटेतही याच मार्गावर शिरवळ शहर दिसू लागल्याने नागरिकांनी आरोग्य विभागास सहकार्य करावे. मास्कचा वापर करावा व कोरोनाच्या सर्व नियमाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी अविनाश पाटील यांनी केले आहे.
Honeymoon ला न जाता बायकोला अभ्यास करायला लावला अन् बायको PSI होताच नवऱ्यानं कडक सॅल्यूट ठोकला
VIDEO : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक; दोन दिवसात तब्बल 1274 जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.