राष्ट्रवादीने भाजपला बरोबर घेत शिवसेनेच्या उमेदवाराला पाडण्यासाठी प्रयत्न केले.
बिजवडी (सातारा) : शेखरजी (Shekhar Gore) जिल्हा बँकेत तुमच्या रूपाने शिवसेनेच्या (Shiv Sena) भगव्याचा प्रवेश झाला असून जिल्ह्याच्या राजकारणातही शिवसेनेची ताकद वाढवत एक दिवस आपल्याला जिल्हा भगवामय करायचा आहे. आपण कायम माझ्या संपर्कात राहा, असे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सांगितले.
सातारा येथे कार्यक्रमानिमित्त मंत्री ठाकरे, शिवसेना उपनेत्या नीलमताई गोऱ्हे (Neelam Gorhe), गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटील, आमदार महेश शिंदे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्ह्यात पाटण व खटाव मतदारसंघात शिवसेनेचे दोन आमदार असून शेखर गोरे यांच्या रूपाने शिवसेनेच्या संचालकाने जिल्हा बॅंकेत प्रवेश केल्याबद्दल मंत्री ठाकरे, नीलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते शेखर गोरेंचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शेखर गोरे म्हणाले,‘‘जिल्हा बँकेत राष्ट्रवादीने भाजपला (BJP) बरोबर घेत शिवसेनेच्या उमेदवाराला पाडण्यासाठी प्रयत्न केले. जिल्ह्यात व मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढवत असताना राष्ट्रवादी कुटिल कारस्थाने करत अडवण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यात महाविकास आघाडी असताना राष्ट्रवादी जिल्हा बँकेत विश्वासात घेत नाहीत. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री, आमदार, पदाधिकारी आम्ही बँकेत कार्यक्रमाला गेलो नाही. आम्ही विश्रामगृहात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. प्रत्येक तालुक्यात आम्ही शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांतही शिवसेना आपली ताकद दाखवून देईल.’’
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) असून जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शिवसेनेला सापत्नपणाची वागणूक देत असल्याची तक्रार आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) व शेखर गोरे यांनी केली. याबाबत आदित्य ठाकरे यांनी मुंबईत या विषयावर शिवसेना व राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांसमवेत बैठक घेण्याचे आश्वासन दिले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.