karad North vidhansabha constituency sakal
सातारा

Karad News : शिवसेना शिंदे गटाने वाढवले भाजपचे टेन्शन, कऱ्हाड उत्तरमधून उमेदवारीवर केला दावा

महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटानेही कऱ्हाड उत्तर हा शिवसेनेचा मतदारसंघ असून, तेथील उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे.

हेमंत पवार

कऱ्हाड - विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कऱ्हाड उत्तर मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात महायुतीतील कोण उमेदवार असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कऱ्हाड उत्तरमध्ये उमेदवारीसाठी भाजपने जय्यत तयारी केली आहे.

मात्र, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटानेही कऱ्हाड उत्तर हा शिवसेनेचा मतदारसंघ असून, तेथील उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे. जाहीर मेळाव्यात शिवसेना (शिंदे गट) नेत्यांनी उमेदवारीची मागणी करून खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत त्यासाठी मेळावा घेणार असल्याचे जाहीर केला आहे. त्यामुळे भाजपमधून निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या संभाव्य उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे.

कऱ्हाड उत्तर मतदारसंघात सातारा, खटाव, कोरेगाव आणि कऱ्हाड तालुक्यांतील गावांचा समावेश होतो. त्यामुळे या मतदारसंघाचे कार्यक्षेत्र हे चार तालुक्यांचे आहे. या मतदारसंघावर राष्ट्रवादी कॉँग्रेस स्थापनेपासून आजअखेर त्याच पक्षाचे वर्चस्व आहे. या मतदारसंघाचे सध्या आमदार बाळासाहेब पाटील हे प्रतिनिधित्व करत आहेत.

या मतदारसंघात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार पाटील यांच्या विरोधात शिवसेनेकडून धैर्यशील कदम, तर अपक्ष म्हणून मनोज घोरपडे यांनी निवडणूक लढवली होती. श्री. कदम आणि श्री. घोरपडे यांच्या मतांची विभागणी आमदार पाटील यांच्या पथ्यावर पडली आणि ते विजयी झाले. त्यावेळपासून आजअखेर भाजपकडून त्या मतदारसंघात वर्चस्व मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

पक्षाच्या माध्यमातून भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, युवा नेते मनोज घोरपडे, भाजपच्या किसान मोर्चाचे उपाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी सरकारमधील मंत्र्यांकडून निधी आणून गावोगावी भाजपची ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असे पक्षांतर्गत दोन गट तयार झाले.

कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील हे खासदार पवार यांच्याबरोबर राहिले आहेत. अजित पवार हे भाजप आणि शिवसेना युतीच्या सरकारमध्ये आल्याने त्यांची ताकद भाजपच्या पथ्यावर पडेल या आशेने कऱ्हाड उत्तरमधील भाजपचे नेते चार्ज झाले आहेत. मात्र, भाजपने निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री हे सातारा जिल्ह्याचे आहेत.

पाटण आणि कोरेगाव तालुक्यात शिवसेनेचा आमदार आहे. पुढील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असणार असून, त्यांच्या विचाराचा आमदार कऱ्हाड उत्तरमधील असेल, तर मतदारसंघाचा चांगला कायापालट करता येईल. परंपरेनुसार कऱ्हाड उत्तर मतदारसंघ हा शिवसेनेचाच आहे. डॉ. श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत लवकरच मेळावा घेणार आहे.

मित्रपक्षाने कऱ्हाड उत्तरच्या जागेसाठी अट्टहास करू नये, असा पवित्रा घेतला आहे, तर भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी कऱ्हाड उत्तरमध्ये भाजपच्या कमळाचाच उमेदवार असेल, असे जाहीर सभेत सांगितले आहे.

त्यातच कऱ्हाड उत्तरमध्ये भाजपमधून निवडणुकीसाठी धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ यांनी तयारी केली आहे. निवडणूक तोंडावर आली असतानाच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कऱ्हाड उत्तर हा शिवसेनेचा मतदारसंघ असल्याचे सांगत उमेदवारीवर दावा केला आहे. त्यामुळे भाजपमधून निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांचे टेन्शन वाढले आहे.

महायुतीच्या जागा वाटपाकडे लक्ष

विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीतील आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष अंतर्गत समन्वयातून जागा वाटप करून निवडणूक एकत्रितपणे लढवतील, अशी सध्यातरी शक्यता आहे. जेथे ज्या पक्षाचा प्रभाव आहे त्या पक्षाच्या उमेदवार देण्यासंदर्भात महायुतीतील नेत्यांकडून वक्तव्य केली जात आहेत.

मात्र, कऱ्हाड उत्तर हा पारंपरिक शिवसेनेचा मतदारसंघ असल्याचा दावा शिंदे गटाच्या नेत्यांकडून केला जात आहे. त्यामुळे कऱ्हाड उत्तरमधील जागा शिवसेनेला, की भाजपला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Latest Maharashtra News Updates : युगेंद्र पवारांच्या सांगता सभेत शरद पवारांंचं भाषण

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

SCROLL FOR NEXT