सातारा : मनमानी पद्धतीने आकारलेली तीन महिन्यांची वीज बिले रद्द करून ग्राहकांना होणारा मनस्ताप विजवितरण कंपनीने थांबवावा, तसेच तीन बिलांच्या सरासरीने बिले काढावीत, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी आज (शुक्रवार) अधिक्षक अभियंता सुनिलकुमार माने यांच्याकडे केली. याबाबत त्यांनी निवेदनही दिले आहे.
याबाबत निवेदनात म्हटले आहे, कि लॉकडाऊनमुळे लोकांचे उद्योगधंदे बंद होते. उत्पन्नाची साधने बंद होती. लोकांपुढे रोजीरोटीचा प्रश्न होता. आता लॉकडाऊन उठला असला तरी, जनजीवन पुर्वपदावर येण्यासाठी थोडा वेळ जाणार आहे. त्यामुळे लोकांकडे पैशांची चणचण आहे. अशा स्थितीत वीज वितरण कंपनीने नागरिकांना वाढीव बिले देऊन त्यांच्या अडचणीत भर टाकली आहे. तीन महिन्यांपुर्वी ज्या रकमेचे बील होते ते आता वाढवून आले आहे. ज्यांचे बील शंभर रुपये होते. त्यांना दीडशे तर, ज्यांचे दोनशे आहे. त्यांना तीनशे, साडेतीनशे अशी वाढीव बिले आली आहेत. आधिच आर्थिक अडचणीत सापडलेल्या लोकांना वाढीव बीलाची रक्कम भरणे शक्य नाही. तसेच बीलाची रक्कम कमी करण्यासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. या सर्व बाबी चुकीच्या असून, ग्राहकांना होणारा मनस्ताप त्वरीत थांबवणे आवश्यक आहे. त्यामुळे तीन महिन्यांपुर्वी आलेल्या बिलाप्रमाणे आकारणी करावी व ती बीले भरुन घेण्याची व्यवस्था कंपनीने तातडीने करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. या वेळी नगरसेवक अमोल मोहिते, राजू गोरे, हर्षल चिकणे आदी उपस्थित होते.
हेही वाचा - सध्या, मीटर रिडींग घेऊन प्रत्यक्ष वीजवापरानुसार एप्रिल आणि मे महिन्यांसह जून महिन्याचे एकत्रित वीजबिल देण्यात येत आहे.
कनेक्शन तोडून नका
मीटर रिडींग घ्यावे आणि मगच ग्राहकांकडून बिलाची मागणी करावी. दुकान तीन महिने बंद असूनही हजारो रुपये बिल येते, म्हणजे काहीतरी चुकीचे आहे. त्यामुळे बिल भरले नाही, म्हणून कोणाचेही कनेक्शन तोडू नका, कोणावर दबाव टाकू नका. ग्राहकांशी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सौजन्याने बोलावे, अशा सुचना शिवेंद्रसिहराजे यांनी केल्या आहेत.
शेतकऱ्यांनी विरोध करू नये, माझे प्रयत्न तुमच्यासाठीच सुरु आहेत : शिवेंद्रसिंहराजे भाेसले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.