Reservation esakal
सातारा

मराठा, धनगर, मुस्लिम, ओबीसी आरक्षणासाठी सर्वपक्षीयांचे राज्यपालांना साकडे

राजेंद्र वाघ

कोरेगाव (सातारा) : मराठा (Maratha Reservation), धनगर व मुस्लिम समाजाला आरक्षण (Muslim community reservation) मिळावे, मागासवर्गीयांची पदोन्नती (Backward Classes Promotion Reservation), तसेच ओबीसींचे राजकीय आरक्षण (OBC political reservation), या प्रमुख प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या फलटण- कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे क्षेत्रप्रमुख अमोल आवळे (Amol Awale) यांच्या नेतृत्वाखाली गेल्या २६ तारखेला सातारा येथून सुरू झालेली सर्वपक्षीय पदयात्रा काल मुंबईमध्ये राजभवन येथे पोचली. या वेळी शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना मागण्यांचे निवेदन दिले. (Shivsena Demand To Governor Bhagat Singh Koshyari To Give Reservation To Maratha Dhangar And Muslim Communities Satara Marathi News)

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत केंद्र सरकारकडे सतत पाठपुरावा करणे गरजेचे आहे. मागासवर्गीयांच्या पदोन्नतीच्या प्रश्नाची सोडवणूक न झाल्यास ते या घटकांसाठी अन्यायकारक ठरणार आहे.

मराठा, धनगर व मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे, मागासवर्गीयांची पदोन्नती, तसेच ओबीसींचे राजकीय आरक्षण, या प्रमुख प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी गेल्या २६ तारखेपासून सातारा ते राज भवन (मुंबई), अशी सर्वपक्षीय पदयात्रा अमोल आवळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली होती. त्यात राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य भाऊसाहेब वाघ, काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष हमीदभाई पठाण, राष्ट्रवादीचे जयेंद्र लेंभे, भारतीय जनता पक्षाचे नितीन चव्हाण, रिपब्लिकन पक्षाचे किशोर सोनावणे, दयानंद पोळ, शिवसेनेचे दत्ता जाधव आदी प्रमुख सहभागी झाले होते. काल ही पदयात्रा राजभवन येथे पोचली.

त्यानंतर पदयात्रेतील सर्व सहभागींच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत केंद्र सरकारकडे सतत पाठपुरावा करणे गरजेचे आहे. मागासवर्गीयांच्या पदोन्नतीच्या प्रश्नाची सोडवणूक न झाल्यास ते या घटकांसाठी अन्यायकारक ठरणार आहे. दरम्यान, ओबीसींचे राजकीय आरक्षण सुप्रिम कोर्टाकडून रद्दबातल करण्यात आले आहे. हे आरक्षणही केंद्र सरकारकडून पूर्ववत होणे गरजेचे आहे. या सर्व प्रमुख प्रश्नांबाबत जनमाणसामध्ये तीव्र भावना आहेत. या भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोचवाव्यात, अशी विनंती अमोल आवळे यांनी शिष्टमंडळाच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केली आणि तसे निवेदन सादर केले.

Shivsena Demand To Governor Bhagat Singh Koshyari To Give Reservation To Maratha Dhangar And Muslim Communities Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT