मसूर (सातारा) : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी घेतलेले लोकहिताचे निर्णय जनतेपर्यंत पोचवावेत. त्यांनी केलेल्या आवाहनानुसार शिवसेनेतर्फे शिवसंपर्क अभियान (Shivsampark Abhiyan) सतर्कतेने व कार्यक्षमपणे राबवावे, असे आवाहन शिवसेनेचे उपनेते व सातारा-सांगली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील (Nitin Banugade-Patil) यांनी हेळगाव येथे केले. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक, संपर्कप्रमुख शंकर सकपाळ, कऱ्हाड उत्तर तालुकाप्रमुख सतीश पाटील, दत्ता पवार, बाबासाहेब बनसोडे, उध्दव घोलप, गोरख पवार, मोहन बर्गे, मनोज जगदाळे, राजेंद्र घाडगे, अतुल वैद्य, सुहास शिंदे, शिवाजीराव जगदाळे, सचिन सूर्यवंशी, सुशांत सूर्यवंशी उपस्थित होते. (Shivsena Leader Nitin Banugade-Patil Shivsampark Campaign At Helgaon bam92)
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतलेले लोकहिताचे निर्णय जनतेपर्यंत पोचवावेत, असे आवाहन शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील यांनी हेळगाव येथे केले.
श्री. बानुगडे-पाटील म्हणाले, ‘‘शिवसेनेतर्फे शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात गाव तिथे शाखा, बूथनिहाय बूथप्रमुख यांच्या याद्या बनवून कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात अभियान सतर्कतेने राबवावे. अभियानाचे होत असलेले कार्यक्रम, शासनाच्या वतीने लोकहिताचे घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोचवावेत. शिवसेना पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करावा. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.’’ सुभाष पाटील यांनी प्रास्ताविक केले. शरद कुंभार यांनी आभार मानले.
Shivsena Leader Nitin Banugade-Patil Shivsampark Campaign At Helgaon bam92
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.