कऱ्हाड : शहरातील कोरोना प्रतिबंधक लसीचा साठा संपला आहे. त्यामुऴे चारपैकी तीन लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ आराेग्य विभागावर आली आहे. बुधवारी दिवसभरात 70 लस देण्यात आल्या होत्या. त्यानंतर लस शिल्लक नसल्याने तीन केंद्र बंद ठेवावी लागली आहे. उद्यापर्यंत (शुक्रवार) लस पुरवठा सुरळीत होईल, असे आरोग्य विभागातील आर. डी. भालदार यांनी सांगितले.
येथील नागरी आरोग्य केंद्रात नुकताच कोविड लसीकरणास प्रारंभ झाला आहे. लसीकरणासाठी सात आरोग्यसेविका तसेच नर्स स्टाफ, फार्मासिस्ट, दोन डेटा एंट्री ऑपरेटर यांची नियुक्ती करण्यात आली हाेती. लसीकरणासाठी पालिकेतर्फे मंडप घालण्यात आला आहे. त्यासाठी अंगणवाडीची जागा आहे. तेथे वेटिंगरूम, निरीक्षण कक्ष तयार केला आहे. याबराेबरच शहरातील 45 वर्षांवरील सगळ्यांचेच लसीकरणासाठी तीन लसीकरण केंद्रे उभारण्यात आली.
दरम्यान लसीचा पूरवठा संपल्याने शहरातील तीन लसीकरण केंद्र बंद करण्यात आली आहेत. नागरी आरोग्य केंद्रात लसीकरण सूरू आहे. या केंद्रावर लसीचा पुरवठाही अल्प आहे. तो फक्त आज पूरेल एवढाच आहे. लसीचा साठा उपलब्ध झाल्यानतंर सर्व केंद्रावर लसीकरण सूरू होईल असेही भालदार यांनी स्पष्ट केले.
चिंताजनक! साताऱ्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, या रुग्णालयांत शिल्लक आहेत बेड, व्हेंटिलेटर, ICU; जाणून घ्या नेमकी स्थिती..
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.