दिव्यांग 
सातारा

दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया राबवा- राज्य अपंग कर्मचारी संघटना

अशपाक पटेल

खंडाळा (जि.सातारा) : दिव्यांग कर्मचाऱ्यांची स्वतंत्र सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करून 29 मेच्या शासन निर्णयातील त्रुटी दूर करून चार टक्के पदोन्नतीची प्रक्रिया लवकर राबवावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र पाटील, सचिव परमेश्वर बाबर यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्याची माहिती सातारा जिल्हा अपंग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष हणमंतराव अवघडे यांनी दिली.
 
सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय पाच मार्च 2002 नुसार दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये तीन टक्के आरक्षण विहित केलेले आहे. या आदेशानुसार सर्व विभागप्रमुख, कार्यालयप्रमुख दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या ठरविलेल्या पदावर पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यासाठी पदनिहाय स्वतंत्र यादी तयार ठेवावी, असा आदेश आहे; परंतु अशी स्वतंत्र यादी कोणत्याही कार्यालयाने ठेवलेली दिसून येत नाही. याबाबत कारवाई व्हावी व पदोन्नती द्यावी, असे पत्रकात म्हटले आहे. 

तसेच 29 मे 2019 च्या शासन निर्णयानुसार बिंदू नामावलीची स्वतंत्र नोंदवही नसल्याने पदोन्नतीसाठी पात्र दिव्यांगांवर अन्याय होत आहे. ही बिंदू नामावली लवकर तयार करावी व 14 जानेवारी 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार दिव्यांगांना पदोन्नतीत आरक्षण ठेवण्यात यावे, तसेच दिव्यांगांची पदे भरण्यात येतात, की नाही हे तपासण्याची यंत्रणा कार्यान्वित करावी व तक्रार निवारण अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशा मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत.
 
सातारा जिल्ह्यातील सर्व कार्यालयांत दिव्यांगांना पदनिहाय पदोन्नती व यासाठी आवश्‍यक बिंदू नामावलीबाबत लवकरच कार्यवाही करावी. जिल्ह्यातील दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. अवघडे यांनी केले आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT