सातारा : एसटीमध्ये एकही प्रवासी नव्हता... वाहक आणि मीच... साधारण साडेदहाची वेळ... पिलीव घाटातील वळणावर पाच ते सहा युवकांनी अचानक बसवर दगडफेक सुरू केली... संकटाचा अंदाज आला... न डगमगता बस तशीच पुढे नेली... समोरून येणाऱ्या वाहनचालकांना सावध केले... घाटाच्या पायथ्याला बस थांबवल्यानंतर सुटकेचा निश्वास सोडला... नशीब बलवत्त म्हणूनच वाचलो...
सातारा- पंढरपूर मार्गावर दोन दिवसांपूर्वी पिलीव घाटात बसवर झालेल्या दगडफेकीतील चालक युवराज सुभाष कदम यांची ही प्रतिक्रीया. पांढरवाडी (ता. खटाव) येथील रहिवाशी असलेल्या युवराज यांनी 2009 मध्ये एसटीचे स्टेरिंग हातात घेतले. यापूर्वीच्या 11 वर्षांच्या सेवेत त्यांनी राज्यभर एसटी नेली. मात्र, त्यांना असा अनुभव कधीच आला नव्हता. हा वाईट अनुभव घेतानाही त्यांनी दाखवलेले धैर्य कौतुकास्पद आहे. नेहमीप्रमाणे मंगळवारी (ता. 19) सायंकाळी सात वाजता कोरेगाव आगाराची सातारा- सोलापूर ही बस घेऊन निघालो. पावणेदहा वाजता म्हसवडला पोचलो. तेथे प्रवासी घेण्यासाठी काही काळ थांबलो. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास वाहकासह प्रवाशाविना सोलापूरला निघालो. साधारण साडेदहाच्या सुमारास पिलीव घाटातील वळणावर बाभळीच्या झुडपाखाली पाच ते सहा युवक उभे असलेले दिसले. काही क्षणात त्यांनी बसवर दगडफेक सुरू केली. त्यात बसच्या पुढच्या काचेवर तीन दगड पडले. माझ्या समोरच्या भागातील काच फुटली.
भाविकांनाे! घरबसल्या पहा श्री खंडोबा- म्हाळसाचा विवाह सोहळा
काचेचे तुकडे लागून किरकोळ जखमा झाल्या. एसटीमध्ये दोघेच... थांबलो तर बेदम मार मिळणार... कसलाही विचार न करता बस तशीच पुढे नेली. घाटातून म्हसवडकडे येणाऱ्या वाहनचालकांना सावध केले. या सर्व वाहनांसह बस घेऊन घाटाच्या पायथ्याला असलेल्या हॉटेलसमोर थांबलो आणि सुटकेचा निश्वास सोडला... काही वेळातच दुचाकीस्वार युवक रक्तभंबाळ अवस्थेत आला. या घटनेपूर्वीही दोन ट्रकवर दगडफेक झाल्याची माहिती मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांशी संपर्क साधला. पोलिसही तातडीने घटनास्थळी आले... या प्रकारानंतर एसटीच्या अधिकाऱ्यांनी धीर देत आपुलकीने चौकशी केली. पोलिस विभागानेही चांगले सहकार्य केल्याची प्रतिक्रिया युवराज यांनी दिली.
पिलीव घाटात पोलिस पेट्रोलिंगची गरज
सातारा- पंढरपूर मार्ग हा सोलापूरला जाण्यासाठी महत्त्वाचा आहे. पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांचीही संख्या मोठी असल्याने या मार्गावरून दिवस-रात्र वाहतूक सुरू असते. या मार्गावरील पिलीव घाट हा लुटमारीसाठी प्रसिद्ध आहे. यापूर्वी अनेकदा अशा प्रकारच्या घटना घडल्या आहे. त्यामुळे या घाटात रात्रीच्या वेळी पोलिस पेट्रोलिंगची गरज आहे, असे अनेक वाहनचालक बोलून दाखवत आहेत.
पिलीव घाटात सातारा-पंढरपूर बसवर दगडफेक; दरोड्याच्या अफवेने सातारा-सोलापूर पोलिसांची पळापळ
सरकारी कर्मचाऱ्यांनाे! BSNLने तुमच्यासाठी आणलीय खास याेजना
शिवेंद्रसिंहराजे बारामतीत भेटले पवारांना; नवीन राजकीय समीकरणे उदयास?
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.