Storm esakal
सातारा

सोळशीला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; घरांची पडझड

राहूल लेंभे

पिंपोडे बुद्रुक (सातारा) : सोळशी (ता. कोरेगाव) येथे वादळामुळे (Storm) मोठे नुकसान झाले. काल सायंकाळी सहा वाजता गावच्या उत्तरेकडील हरेश्वर डोंगर पायथ्यालगतच्या शेतकऱ्यांना (Farmers) या वादळाला सामोरे जावे लागले. या वेळी शेतातील पत्र्याचे शेड, जनावरांचे गोठे, तसेच विद्युत खांबाचे (Electric Pole) नुकसान झाले. रविवारी सायंकाळी अचानक आलेल्या वळिवाच्या पावसाने (Rain) शेतकऱ्यांची त्रेधा उडाली. सोळशी, नायगाव, नांदवळ परिसरात सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाला. (Storm Damage To Houses In Solashi Village Satara Marathi News)

सोळशीत वादळामुळे मोठे नुकसान झाले असून डोंगर पायथ्याशी असलेल्या भागातील शेडवरील पत्रे उडून गेले आहेत.

पावसासोबतच जोरदार वादळही आले. त्यामुळे डोंगर पायथ्याशी उंचावट्यावर असलेल्या भागातील शेडवरील पत्रे उडून गेले. विद्युत खांब कोसळले. जुन्या घरांच्या भिंती पडल्या. एका फार्म हाउसचे 50 हजारांचे नुकसान झाले. सुमारे 20 शेतकऱ्यांना या वादळाची झळ बसली. ग्रामपंचायतीतर्फे (Gram Panchayat) या नुकसानीची पाहणी करण्यात आली. तलाठी माळी यांनी आज सकाळी पंचनामे करुन वरिष्ठांना पाठवले आहेत. आमदार दीपकराव चव्हाण (MLA Deepak Chavan) यांनी नुकसानग्रस्तांना आर्थिक मदतीचे आश्वासन दिले आहे. उद्योजक दिगंबर आगवणे यांनी सकाळी 11 वाजता गावात भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. या वेळी त्यांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली. या वेळी संतोष सोळसकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Storm Damage To Houses In Solashi Village Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: उड्डाणादरम्यान नरेंद्र मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड, विमानतळावरच अडकून पडले!

Sharad Pawar: शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा, म्हणाले- अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते अन्....

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

SCROLL FOR NEXT