Sugarcane Bill esakal
सातारा

अथणी-रयत शुगर्सचे 2925 रुपये ऊसबिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

हेमंत पवार

कारखान्याने 38 दिवसांत एक लाख 22 हजार मेट्रीक टन उसाचे गाळप केले आहे.

कऱ्हाड (सातारा) : शेवाळेवाडी-म्हासोली (ता. कऱ्हाड) येथील अथणी शुगर्स-रयत साखर कारखान्याने (Athani Sugars-Rayat Sugar Factory) यंदाच्या गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या उसाला प्रति मेट्रीक टन दोन हजार ९२५ रुपयांप्रमाणे एफआरपीची एक रक्कमी रक्कम शेतऱ्यांच्या खात्यावर जमा केलीय. त्याचबरोबर तोडणी वाहतुकीचीही बिले बँक खातेवर जमा केल्याची माहिती अथणी शुगर्सचे कार्यकारी संचालक श्रीनिवास पाटील (Director Shrinivas Patil) यांनी दिली.

यावेळी रयत कारखान्याचे अध्यक्ष अॅड. उदयसिंह पाटील (Adv. Udaysingh Patil), अथणी शुगर्सचे संचालक योगेश पाटील, सुशांत पाटील, युनिट प्रमुख रवींद्र देशमुख, शेती अधिकारी विनोद पाटील आदी उपस्थित होते. शेवाळेवाडी येथील अथणी रयतने सर्वात पहिल्यांदा एफआरपी जाहीर करत सातारा जिल्ह्यतील ऊस दराची कोंडी फोडली होती. यंदा २३ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत गाळपास आलेल्या उसाचे ऊस बिल शेतकऱ्याच्या बँक खातेवर वर्ग केले आहे.

कारखान्याने ३८ दिवसांत एक लाख २२ हजार मेट्रीक टन उसाचे गाळप केले असून एक लाख २७ हजार साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. अथणी शुगर्स-रयतने मागील गळीत हंगामातील गाळपास आलेल्या उसास दोन हजार ९०० रुपये एकरक्कमी दर दिला होता. यंदाच्याही हंगामात अथणी शुगर्स- रयतने ऊस उत्पादक शेतकऱ्याची मागणी विचारात घेवून एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ऊसबिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहेत. कारखान्याने पाच लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवल्याचेही श्री. पाटील यानी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kangana Ranaut: महाराष्ट्राचा निकाल लागताच कंगनानं उद्धव ठाकरेंना दैत्य संबोधलं! म्हटलं...

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: पहिला दिवस संपला! स्टार खेळाडूंनी भाव खाल्ला; अनेक खेळाडू झाले मालामाल

Nilesh Rane : आमदार होताच निलेश राणेंची धमकी, म्हणाले, ...तर त्याचा जागेवरच बंदोबस्त करु

IND vs AUS 1st Test: ४ बाद, १७ धावा! टीम इंडियाचा दरारा; ऑस्ट्रेलियात मोडला ११३ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम

Latest Maharashtra News Updates : हेमंत रासने यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

SCROLL FOR NEXT