sugarcane worker group fraud of 51 crore crime satara police esakal
सातारा

Satara News : ऊसतोड टोळ्यांकडून ५१ कोटींचा गंडा

दोन वर्षांतील स्थिती : गुन्हा नोंद होऊनही पोलिस तपासाची हालेनात चक्रे

सकाळ वृत्तसेवा

सातारा : गळीत हंगामादरम्‍यान ऊसतोडीसाठी येणाऱ्या टोळ्यांकडून जिल्ह्या‍तील शेतकरी, वाहतूकदारांना गेल्‍या दोन वर्षांत ५१ कोटींना गंडा घातल्‍याची १ हजार १७३ प्रकरणे समोर आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात गंडा घालून ऊसतोड न करतानाच पसार होणाऱ्या या टोळ्यांविरोधात गुन्‍हा नोंद असूनही त्‍यांना पकडणे पोलिसांना अद्यापही शक्‍य झालेले नाही.

दर वर्षी असे फसवणुकीचे प्रकार घडत असून, त्‍यांना रोखण्‍यासाठी आगामी काळात प्रभावी कायदा होण्‍याची आवश्‍‍यकता असल्‍याची मागणी शेतकरी, वाहतूकदारांकडून होत आहे. जिल्ह्यात ऊस लागवडीखालील क्षेत्र मोठे आहे. त्‍यावर प्रक्रिया करणारे सहकारी आणि खासगी साखर कारखाने सक्रिय आहेत.

हे कारखाने गळीत हंगामाचे नियोजन करत त्‍यासाठीचा आराखडा तयार करतो. यानंतर वाहतुकीसाठीचे करार करून टोळीची जबाबदारी घेतलेल्‍या वाहतूकदार ऊसतोडणीसाठीच्‍या टोळ्यांशी करार करतात. त्या करारानुसार टोळ्यांचे मुकादम ठरलेल्‍या रकमेपैकी १० ते १५ लाख उचल घेतात. मात्र, नंतरच्‍या काळात त्‍याठिकाणी टोळी पाठविण्‍याचे किंवा पाठविलेली टोळी रातोरात त्‍याठिकाणाहून इतरत्र नेतात.

जिल्ह्यात प्रामुख्‍याने विदर्भ, लातूर, तसेच इतर ठिकाणाहून ऊसतोडीसाठी टोळ्या येतात. या टोळ्यांनी करारापोटी रक्कम घेऊन ऊसतोड न केल्‍याने जिल्ह्यातील १ हजार १७३ जणांची फसवणूक झाली आहे.

या फसवणुकीचा गेल्‍या दोन वर्षांतील आकडा ५१ कोटी २३ लाखांच्‍या घरात आले. या फसवणुकीच्या तक्रारी नोंदविल्‍यानंतर पोलिसांकडून कोणत्‍याही स्वरूपाची गतिमान कारवाई होत नसल्‍याचे दिसून येते. त्यामुळे शेतीपूरक व्‍यवसाय करणाऱ्या वाहतूकदारांचा संसार अडचणीत येऊ लागला आहे.

करार करण्‍यासाठी अनेक वाहतूकदार कर्ज काढतात. त्‍यातच टोळीकडून फसवणूक झाल्‍याने घेतलेले कर्ज जागेवर राहून अनेकांच्‍या घरावर बँकांनी बोजा नोंदल्‍याच्‍या अनेक घटना आहेत. याच अनुषंगाने स्‍वाभिमानी पक्षाचे अध्‍यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी पोलिस आयुक्तांशी पत्रव्‍यवहार करत सर्व पोलिस ठाण्‍यांना या फसवणुकीचा तपास गतिमान करण्‍यासाठीच्‍या सूचना देण्‍याची मागणी केली आहे.

एकापेक्षा अधिक वाहतूकदारांशी करार...

साताऱ्यासह सोलापूर, सांगली, पुणे, कोल्‍हापूर, यवतमाळ, नांदेड येथे गेल्‍या दोन वर्षांत अशाच प्रकारे ऊस वाहतूकदारांची मुकादमांनी टोळ्यांच्‍या नावाखाली फसवणूक केली आहे. या फसवणुकीच्या प्रकरणांची संख्‍या १० हजारांहून अधिक असून, त्‍याचा एकत्रित आकडा ४६६ कोटींच्‍या घरात आहे. फसवणूक करणाऱ्यांनी एकापेक्षा जास्‍त वाहतूकदारांशी देखील करार केल्‍याचे उघड झाले आहे.

खुदतोडीचा पर्याय...

दर वर्षी अशा प्रकारे टोळ्यांकडून शेतकरी, वाहतूकदारांची आर्थिक फसवणूक होत असते. हे टाळण्‍यासाठी गावपातळीवर ऊसतोडीचे नियोजन करत खुदतोड हा पर्याय शेतकऱ्यांनी परस्‍पर सामंजस्‍याने निर्माण करावा. फसवणुकीचे गुन्‍हे निकाली काढण्‍यासाठी पोलिसांनीही स्‍वतंत्र यंत्रणा उभारणे आवश्‍‍यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: मकबा हाईट्समध्ये रात्री बैठक अन् माझ्या राजसाहेबांना फसवलं... वांद्रेत मोठी सेटलमेंट? मनसेत खळबळ माजवणारा गौप्यस्फोट

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा 'या' दिवशी होणार

Mahayuti: बंडोबांना थंड करण्यात महायुतीला येणार का यश? अन्यथा 'या' मतदारसंघात बसू शकतो फटका

Narak Chaturdashi 2024: 30 कि 31 ऑक्टोबर कधी आहे छोटी दिवाळी? काय करावे अन् काय करू नये? वाचा एका क्लिकवर

Mumbai Vidhansabha: मुंबई उपनगरात ३२४ उमेदवार मैदानात

SCROLL FOR NEXT