सातारा : जिल्हा पोलिस दलात (Satara Police Force) कार्यरत असणाऱ्या ४९९ पोलिस कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय, तसेच कार्यकाळ पूर्ण झाल्याच्या कारणास्तव पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल (Superintendent of Police Ajay Kumar Bansal) यांनी बदल्यांचे आदेश जाहीर केले आहेत. या बदल्या करण्यापूर्वी श्री. बन्सल यांनी प्रत्येक कर्मचाऱ्यांशी वैयक्तिक संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत आवश्यक त्या ठिकाणी नेमणुका देण्यावर भर दिला.
पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया गतवर्षीच्या कोरोना फैलावामुळे लांबवणीवर पडलेली होती.
सातारा पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया गतवर्षीच्या कोरोना फैलावामुळे लांबवणीवर पडलेली होती. कोरोनाचा कहर कमी होऊ लागल्यामुळे पोलिस दलातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना गतिमान करण्याच्या प्रक्रिया मुख्यालयात सुरू झाल्या होत्या. यानुसार प्रत्येक पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या, तसेच कार्यकाळ पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची माहिती मागविण्यात आली होती. या माहितीची छाननी केल्यानंतर बदली प्रक्रिया जाहीर करण्यापूर्वी श्री. बन्सल यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याशी वैयक्तिक संवाद साधला.
संवादादरम्यान श्री. बन्सल यांनी कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय, मुलांच्या शिक्षणविषयक आणि कौटुंबिक तसेच काही महिन्यांत सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या अडचणी जाणून घेतल्यानंतर श्री. बन्सल यांनी १६२ कर्मचाऱ्यांना नेमणुकीच्या ठिकाणीच एक वर्ष कालावधीसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. याचबरोबरच त्यांनी एकाच पोलिस ठाण्यात, विभागात कार्यकाळ पूर्ण केलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी प्राधान्यक्रमाने दिलेल्या ठिकाणानुसार ३३७ कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया पूर्ण केली. बदली प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यासाठीचा आदेश काल रात्री पोलिस मुख्यालयातून श्री. बन्सल यांच्या सहीनिशी जाहीर करण्यात आला. या आदेशात बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना सध्या कार्यरत असणाऱ्या ठिकाणच्या तपासाचा निपटारा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याचबरोबर बदलीच्या ठिकाणी हजर होण्यास टाळाटाळ करत बदलीच्या अनुषंगाने प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष प्रयत्न केल्याचे निदर्शनास आल्यास खातेनिहाय कारवाईचे संकेतही श्री. बन्सल यांनी दिले आहेत.
धीर आणि मताचा आदर
बंदोबस्त तसेच इतर कामादरम्यान बाधित झालेले अनेक कर्मचारी सध्या विलगीकरणात उपचार घेत आहेत. यापैकी अनेक कर्मचारी बदली निकषास पात्र होते. या कर्मचाऱ्यांशी बदली प्रक्रिया पूर्ण करत असताना अजय कुमार बन्सल यांनी व्हिडिओ कॉलव्दारे संपर्क साधत चर्चा केली. चर्चा करतानाच त्यांना धीर देऊन मते जाणून घेत त्यांना प्राधान्यक्रमानुसार नवीन ठिकाणी बदली देण्यावर भर दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.