सातारा

अपहरण झालेल्या बाळाच्या शोधार्थ 22 प्रमुख अधिका-यांची 12 पथके; अधीक्षक सातपुतेंचे नागरिकांना आवाहन

रमेश धायगुडे

लोणंद (जि. सातारा) : काळज (ता. फलटण) येथील पाळण्यात झोपलेल्या ओम आदिक भगत (वय १० महिने) या तान्हुल्याचे मंगळवारी (ता. २९) रोजी सांयकाळी ४.३० ते सव्वापाच वाजण्याच्या सुमारास दुचाकी वरून आलेल्या अनोळखी एक पुरुष व एका महिलेने या बाळाला पाळण्यातून उचलून नेहून अपहरण केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे खंडाळा, फलटण तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

दरम्यान, जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी आज (ता. ३०) घटनास्थळी भेट देवून तपासाची सुत्रे वेगाने फिरवत या बाळाच्या शोधार्थ विविध ठिकाणी पोलिसांची १२ पथके रवाना केली आहेत. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत पोलिसांना या बाळाचा व अपहरणकर्त्यांचा शोध घेता आला नाही. नेमके कोणत्या हेतूने व कोणत्या कारणासाठी या दोघांनी या तान्हुल्याचे अपहरण केले. याबाबत काहीही समजून शकले नाही.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, काळज येथील रामनगर येथे त्रिंबक दत्तात्रय भगत हे आपल्या कुटुंबासमवेत राहतात. त्यांना चार मुली व एक मुलगा आहे. मंगळवारी संध्याकाळी साडेचार ते सव्वापाच वाजण्याच्या सुमारास भगत हे शेजारीच असलेल्या आपल्या शेतात काम करत होते. घराच्या एका खोलीत झोपलेल्या बाळाला पाळण्यात झोपवले होते. त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती घरात डोकावून गेल्याचे त्यांच्या मुलीने सांगितले. त्यानंतर काही वेळाने २० ते २५ वयाचा काळा शर्ट घातलेल्या एका अनोळखी व्यक्तीने घरात घुसून त्या बाळाला पाळण्यातून उचलून घेवून मोटार सायकलवरून पसार झाला. त्यावेळी त्याच्या समवेत गुलाबी रंगाची साडी अथवा ड्रेस घातलेली महिलाही असल्याचे त्रिंबक भगत यांच्या मोठ्या मुलीने पाहिले. तीने आरडाओरडा केला, मात्र लोक जमा होईपर्यंत हे दोघेही बाळाला घेवून मोटार सायकलवरून पसार झाल्याचे आजूबाजूचे लोक सांगत आहेत. 

जमलेल्या लोकांपैकी मोटार सायकलवरून त्यांचा पाठलाग करून त्या दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते मिळून आले नाहीत. त्रिंबक भगत यांना चार मुलींच्या पाठीवर ओम जन्मला होता. मात्र, त्याचेही अपहरण झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत काहीही माहिती मिळाल्यास लोणंद पोलिस ठाणे अथवा जिल्हा पोलिस यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनीही घटनास्थळी भेट देवून या घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्ह्यातील २२ प्रमुख अधिकारी यांची १२ पथके विविध ठिकाणी तपासासाठी रवाना केली आहेत. या घटनेची नोंद लोणंद पोलिस ठाण्यात झाली असून सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी हे अधिक तपास करत आहेत.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS 1st Test : अपर कट अन् शतक! Yashasvi Jaiswal ची ऑस्ट्रेलियात सेंच्युरी; ४७ वर्षांपूर्वीच्या गावस्करांच्या विक्रमाशी बरोबरी

Who Is Maharashtra CM: शिंदेंना मान्यता मिळणार की फडणवीस महाराष्ट्राची कमान सांभाळणार? मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोण पुढे?

मंगळवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी! सोलापूर जिल्ह्यातील एका आमदाराला मिळणार कॅबिनेट मंत्रिपदाची संधी? विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुखांची नावे चर्चेत

Rohit Sharma येतोय...! हिटमॅन ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निघाला, पत्नी रितिका एअरपोर्टवर आली होती सोडायला, Video

Sakal Podcast: महायुतीचा महाविजय, मविआचा धुव्वा ते शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना!

SCROLL FOR NEXT