मायणी (जि. सातारा) : येथील ग्रामपंचायतीकडून विकासकामांना परवानगी दिली जात नाही. विकासकामांचे हस्तांतरण करण्यात अडचणी निर्माण केल्या जात आहेत. अशा परिस्थितीतही अडथळ्यांची शर्यत पार करीत विकासकामांसाठी निधी आणण्यात कमी पडणार नाही, असा विश्वास जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी व्यक्त केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील श्री सद्गुरू यशवंतबाबा रथोत्सव व यात्रापूर्व नियोजन बैठकीत ते बोलत होते. त्या वेळी ट्रस्टचे सचिव द. ग. माने गुरुजी, ट्रस्टचे सर्व विश्वस्त, शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक किरण देशमुख, दादासाहेब कचरे, प्रकाश कणसे, महेश जाधव, हेमंत जाधव, स्वप्नील घाडगे, विकास सकट, आबासाहेब माने, गौरीहर श्रीखंडे, आनंदा माळी, खाशाबा पाटोळे, लोहार गुरुजी, अमित माने, नामदेव शिंदे उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या सुरक्षिततेसाठी शासकीय नियमांचे पालन करून रथोत्सव साजरा करण्याचे आवाहन करून गुदगे म्हणाले, ""यशवंतबाबा पुण्यतिथी व भंडाऱ्याचा कार्यक्रम आज शुक्रवार (ता. 2) होणार असून, बुधवारी (ता. 7) रथोत्सव आहे. त्यादिवशी मंदिरामध्ये फक्त धार्मिक विधी होतील. रथ फिरवला जाणार नाही. सर्व कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडण्याची जबाबदारी यात्रा समितीची राहील. भाविकांसाठी विविध सोयी- सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. विविध विकासकामे केली जात आहेत. मात्र, ग्रामपंचायतीकडून अडथळे उभे केले जात आहेत.'' विजय माने यांनी सूत्रसंचालन केले.
दरम्यान, सर्वानुमते यात्रा समिती निवडण्यात आली. त्यामध्ये अध्यक्षपदी संभाजी वाघ, उपाध्यक्षपदी रमेश बाबर, अमित माने (सचिव) व खजिनदारपदी नामदेव शिंदे यांची निवड करण्यात आली. दरम्यान, बुधवारी (ता. 7) सुरेंद्र गुदगे यांच्या हस्ते बाबांच्या रथाचे पूजन होऊन रथ मंदिराबाहेर दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे बावधनची बगाड यात्रा उत्साहात; प्रशासनाच्या नियमांना ठेंगा
अकलूजच्या मोहिते-पाटलांचा नीरा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचे भूत पुन्हा जनतेच्या मानगुटीवर बसविण्याचा प्रयत्न
Edited By : Siddharth Latkar
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.