कऱ्हाड - अतिवृष्टी नुकसान भरपाई, पीक नुकसान भरपाई, उसाचे पैसे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वसूल करून दिले आहेत. आंदोलन करायला स्वाभिमानी आणि मतांसाठी इतर पक्ष का? येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका संघटना ताकदीने लढवणार आहे. त्यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. उमेदवारांच्या विजयासाठी मी स्वतः आणि प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्राचा दौरा करतील, अशी माहिती संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी येथे दिली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, पक्षाचे प्रदे़शाध्यक्ष प्रा. जालंधर पाटील, सावकर मादनाईक, रविकांत तुपकर, प्रा. प्रकाश पोपळे, प्रकाश बालवडकर, पूजाताई मोरे, प्रशांत डिक्कर, गजानन पाटील-बंगाळे, अमर कदम, अनिल पवार, देवानंद पाटील, प्रमोद जगदाळे, राजू शेळके, दादासाहेब यादव, बापूसाहेब साळुंखे, रामचंद्र साळुंखे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. शेट्टी म्हणाले, १५ ऑगस्टपासून प्रदेशाध्यक्ष दौऱ्यावर येतील. कोणाला निवडणूक लढवायची आहे, त्यांची ते भेट घेऊन मेळावे घेतील. अतिवृष्टी नुकसान भरपाई, पीक नुकसान भरपाई, उसाचे पैसे स्वाभिमानीने वसूल करून दिले आहेत. आंदोलन करायला स्वाभिमानी आणि मतांसाठी इतर पक्ष का? याचा विचार मतदार करून संघटनेच्या उमेदवारांना विजयी करतील. ते म्हणाले, देशातील उद्योगपतींची १० लाख कोटींची कर्जे केंद्र सरकारने माफ केली आहेत. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईला येऊन त्यापोटी कराचा वरवंटा सरकार मात्र सर्वसामान्यांवर फिरवत आहे. शेतकऱ्यांचा कर्जाचा एखादा हप्ता थकला तर त्याचे सीबिल खराब करून त्याला नवीन कर्ज दिले जात नाही. जिल्हा परिषद, पंचायत समितीत जायचे म्हणजे गोरगररिबांना चांगले शिक्षण, आरोग्य सुविधा देण्यासाठी जावे लागेल. राज्यकर्त्यांना उघडे करण्याची ताकद स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आहे.
एकरकमी एफआरपीसाठी पुन्हा आंदोलन
महाराष्ट्रातील साखर कारखाने राजरोसपणे सरासरी वजनाच्या १० टक्के काटा मारतात. मागील हंगामात महाराष्ट्रात १३ कोटी २० लाख टन उसाचे गाळप झाले. म्हणजेच काटा मारून १ कोटी ३२ लाख टन उसाची चोरी झाली. राज्याची सरासरी रिकव्हरी ११.२० आहे. म्हणजेच १४.७८ लाख टन एवढ्या साखरेची चोरी झाली, असा आरोप करून शेट्टी म्हणाले, यंदाच्या गळीत हंगामात उसाला एकरकमी एफआरपीच घेणार असून प्रसंगी सरकार व कारखानदारांशी संघर्ष करून प्रचंड मोठे राज्यव्यापी आंदोलन उभे करू.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.