Takewadi village hotspot esakal
सातारा

ग्रामीण भागात कहर! टाकेवाडीला कोरोनाचा घट्ट विळखा

रुपेश कदम

दहिवडी (सातारा) : माणमधील कोरोनाबाधितांचा (corona patient) आकडा नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश आले आहे. मात्र, टाकेवाडी हॉटस्पॉट (Takewadi village hotspot) बनल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. दहिवडी, म्हसवड या शहरांतील कोरोनाबाधितांची संख्या अत्यंत कमी झाली आहे. पण, अधूनमधून अचानकच वाढणारे रुग्ण पाहता सर्वांनी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. (Takewadi Village In Satara District Became The Corona Hotspot Center Satara Marathi News)

माणमधील कोरोनाबाधितांची आजपर्यंतची संख्या १२,२९० इतकी असली तरी ११,६८५ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

माणमधील कोरोनाबाधितांची आजपर्यंतची संख्या १२,२९० इतकी असली तरी ११,६८५ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. दुर्दैवाने ३१६ जणांचा कोविड-१९ ने बळी घेतला आहे. हे आकडे मोठे असले तरी आजअखेर फक्त २८९ कोरोनाबाधित रुग्ण उपचाराखाली आहेत आणि ही संख्या प्रशासनासह जनतेला दिलासा देणारी आहे. एकीकडे रुग्णसंख्या घटत असताना सतोबाच्या पायथ्याला डोंगरदऱ्यात वसलेल्या टाकेवाडी गाव मात्र हॉटस्पॉट बनू लागले आहे. तालुक्यातील २८९ पैकी फक्त टाकेवाडीत ४५ कोरोनाबाधित आहेत. लक्षणे दिसून सुध्दा तसेच कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलो आहोत, हे माहीत असूनसुध्दा कोरोना चाचणी करण्यास केलेली टाळाटाळ यास कारणीभूत आहे. अचानक वाढलेली कोरोनाबाधितांची संख्या पाहून प्रशासन हबकले होते. मात्र, त्यानंतर मलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील (Malwadi Primary Health Center) वैद्यकीय अधिकारी (Medical officer), कर्मचारी, अंगणवाडी व आशा सेविका, ग्रामपंचायत प्रशासन (Gram Panchayat) यांनी एकत्रित प्रयत्न करून गावात जागृती केली. त्यामुळे आगामी काही दिवसांत ही रुग्णसंख्या आटोक्यात येण्याची शक्यता आहे.

दहिवडीत २७, तर म्हसवडमध्ये फक्त १४ कोरोनाबाधित उपचाराखाली आहेत. यासोबतच पळशी २९, गोंदवले बुद्रुक १६, मोही १६, कुळकजाई १३ व बोडके ११ याच ठिकाणी दोन अंकी कोरोनाबाधित आहेत. तर ३५ गावांत एक आकडी कोरोनाबाधित आहेत. उर्वरित तब्बल ५३ गावांत एकही कोरोनाबाधित नाही. हॉटस्पॉट बनलेल्या लोधवडे, नरवणे, राजवडी व भालवडी या गावांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. सध्या ही सर्व दिलासादायक परिस्थिती असली तरी टाकेवाडीचे उदाहरण बघता व तज्‍ज्ञांच्या अंदाजानुसार संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका पाहता सावधगिरी बाळगण्याची अत्यंत आवश्यकता आहे. प्रशासनाने थोडी ढिलाई दिल्यानंतर जनतेची वागण्याची बेफिकिरी धोकादायक ठरू शकते.

"सामान्य जनतेला आमचे आवाहन आहे की, त्यांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करावे. जनतेने आजपर्यंत प्रशासनाला चांगले सहकार्य केले आहे. अजून काही दिवस सहकार्य करा. कोणावरही कारवाई करण्याची वेळ येऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे."

-बाई माने, तहसीलदार, माण

Takewadi Village In Satara District Became The Corona Hotspot Center Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT