सातारा

तनिष्काच्या चित्रात उमटली 'स्त्री हक्काची' छबी, अमेरिकेला दाखवून दिली सातारची खुबी!

Balkrishna Madhale

सातारा : प्रत्येक यशस्वी व्यक्तीला मिळणारं यश हे त्याच्या कठोर परिश्रम, जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी, आवड, ज्ञान अशा महत्त्वपूर्ण गोष्टींमुळे प्राप्त झालेलं असतं. यश हे सहजासहजी कधीच मिळत नाही. ते मिळवण्याकरता प्रत्येक व्यक्तीला खडतर प्रवास करावाच लागतो. अर्थात, ह्या सर्व गोष्टी साध्य करण्याची क्षमता त्या व्यक्तीमध्ये असायला हवी. यशाकडे वाटचाल करत असताना आपल्याला बऱ्याचदा एक गोष्ट पाहायला आणि अनुभवायला मिळते आणि ती म्हणजे कमतरता.

ही कमतरता नेहमी कष्ट, जिद्द किंवा आत्मविश्वास यांचाशीच निगडीत असते असे नाही. कधीकधी असंही होतं की, सर्व व्यवस्थित सुरू असूनही यश मिळण्याची खात्री मनाला वाटत नाही. कुठेतरी काहीतरी कमी पडत असतं आणि आपल्याला काय कमी पडतंय नेमकं हेच कळत नाही. हळूहळू यशाकडे जाणारा मार्ग खडतर वाटू लागतो, मनातील आशाही मंदावतात आणि सगळ्याच गोष्टी अशक्य वाटू लागतात. आपल्या हाती फक्त अपयशच लागणार असं वाटू लागतं. मात्र, या सगळ्याला सातारची तनिष्का अपवाद आहे. 

आपल्या आयुष्यात कला महत्त्वाच्या, कारण आयुष्यात कला नसेल तर सर्जनशीलतेचा झराच आटल्यासारखा होईल आणि म्हणूनच लहानपणापासूनच मुलांमधील कला जोपासायला हव्यात. मुलांच्या वाढीत चित्रकलेचाही अमूल्य वाटा आहे. अगदी दहा महिन्यांच्या बाळाला देखील रेघोट्यांच्या स्वरूपात चित्र काढण्याच्या संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात. कलेचं आयुष्यातलं महत्त्व समजून घेताना अनेक प्रश्न पडणं साहजिक आहे. शाब्दिक, भाषिक संवादाच्याही आधी मूल अनेकदा चित्रातून संवाद साधत असतं आणि संवाद हे माध्यम मग आयुष्यातल्या अनेक गोष्टींना जोडतं.

तनिष्का नीलेश पांडे मूळची सातारची, सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहे. मात्र, तिने अमेरिकेसारख्या बलाढ्य देशात भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. सातारच्या चिमुरडीने वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी केलेल्या देदिप्यमान कामगिरीचा नक्कीच सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशातील प्रत्येक नागरिकाला अभिमानच वाटेल, असे तिने दिव्य पार केले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण, तनिष्काची कामगिरीही तशीत आहे!

तनिष्काने स्वतःच्या कला गुणाने अमेरिकेच्या राष्ट्रप्रमुखांचे निवासस्थान असलेल्या व्हाइट हाऊस येथे भरवण्यात आलेल्या कला प्रदर्शनात मोठ्या दिमाखात स्थान पटकावले. अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलिनीया ट्रम्प यांनी, "स्त्रियांच्या मतदान हक्काचे 100 वर्षे" या विषयावर हे प्रदर्शन भरवले होते. 24 ऑगस्ट रोजी भरवलेल्या ह्या प्रदर्शनात अमेरिकेतील 50 राज्यातून प्रत्येकी एक चित्र निवडण्यात आले. त्यात भारतीय वंशाच्या तनिष्काला या कठीण विषयावर आपले चित्र सादर करण्याची संधी मिळाल्याने सर्वांचीच मान अभिमानाने उंचावली आहे. वयाच्या केवळ पाचव्या वर्षांपासून तनिष्काला चित्रकलेची आवड निर्माण झाली. तेव्हा पासून तिच्या आई-वडिलांनी नेहमीच तिला प्रोत्साहन दिले, प्रोत्साहित केले. त्या दोघांनीही "स्त्रियांच्या मतदान हक्काचे 100 वर्षे" या विषयाचा इतिहास समजून सांगत, तनिष्काच्या विचारांना गती देत हे गहन अर्थ असणारे चित्र सादर करायला मदत केली.

तनिष्काच्या या चित्रात "महिला या सर्व मतदारांना जगात आणतात, त्यांना मतदानाचा हक्क द्या", हा संदेश सगळ्यांचे लक्ष वेधून घेत अमेरिकेतील वृत्तपत्रांना दखल घ्यायला लावत आहे. देशातल्या महिलांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी अमेरिकेला 144 वर्ष लागली. ब्रिटनमधल्या महिलांना हा हक्क मिळायला 100 वर्ष वाट पाहावी लागली. स्वित्झर्लंडच्या काही भागात महिलांना मत देण्याचा अधिकार 1974 साली मिळाला. या उलट भारतीय महिलांना देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यादिवशीच मतदानाचा अधिकार मिळाला. तनिष्काच्या कल्पना शक्तीला व्हाइट हाऊसपासून ते राज्याच्या महापौरांपर्यंत अनेकांनी दाद देत तिच्या हुशारीचे केले आहे.

नुकतेच अमेरिकेत पार पडलेल्या पॅनसिया आर्टतर्फे कोरोना विरुद्ध लढाई संदर्भात झालेल्या स्पर्धेतसुद्धा तनिष्काने बाजी मारून 1500 डॉलरचे बक्षीस पटकावले. पण, प्रवाहाविरुद्धची वाट पकडत ह्या चिमुरडीने बक्षिसाची सर्व रक्कम अमेरिकेतील इलिनॉय राज्यातील कोव्हिड-19 ग्रस्त लहान मुलांना दान केली. तिच्या ह्या कोवळ्या वयाच्या मानाने सामाजिक भान असलेल्या परिपक्व निर्णयाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

तनिष्का पांडे ही साताऱ्यातील महाराष्ट्र स्कूटरचे माजी जनरल मॅनेजर रमेश पांडे आणि सौ. उषा पांडे यांचे सुपुत्र नीलेश पांडे व स्निग्धा पांडे ह्यांची मुलगी. हे दाम्पत्य 2006 पासून अमेरिकेत स्थित असून दोघेही कॅटरपिलर ह्या प्रख्यात कंपनीमध्ये कार्यरत आहेत. कैक वर्षे अमेरिकेत स्थायिक असूनही दोघांनी भारतीय नाळ जपून ठेवली असून तनिष्का आणि अरहान ह्या दोन्ही मुलांवर पूर्ण भारतीय संस्कार केलेले आहेत. या यशाबद्दल तनिष्का पांडे व कुटुंबीयाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT