Shambhuraj Desai esakal
सातारा

भाजप-राष्ट्रवादीला धक्का; सत्ताधाऱ्यांनीच केला शिवसेनेत प्रवेश

यशवंतदत्त बेंद्रे

'आपल्या शत्रूचा शत्रू तो आपला मित्र' या सूत्रानुसार राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांची निवडणूकपूर्व आघाडी झाली होती.

तारळे (सातारा) : सत्तेच्या सारीपाटावरून ग्रामपंचायतीत सुरू झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व भाजपच्या (BJP) सत्ताधारी आघाडीतील धुसफुसीचे पर्यावसन अखेर पक्षांतरात झाले. भाजप समर्थक म्हणून निवडून आलेले विद्यमान उपसरपंच सुधा पवेकर व दोन ग्रामपंचायत सदस्यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला. त्यामुळे ग्रामपंचायतीत सेनेचे दहा सदस्य, तर राष्ट्रवादीचे सात सदस्य झाले आहेत. आगामी ग्रामपंचायत कारभारात त्याचे काय पडसाद उमटतात, याकडे तारळेरांचे लक्ष लागले आहे.

ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक वर्षापूर्वी झाली. आपल्या शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या सूत्रानुसार राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांची निवडणूकपूर्व आघाडी झाली होती. केवळ शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवणे या एकाच भूमिकेतून दोघांनी ताकद पणाला लावली होती. आघाडीचे काही मोहरे गारद झाले. आघाडीने ठरविलेली गोष्ट साध्य करीत सेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यात आले. आघाडीने दहा जागांवर विजय मिळवत सत्ता हस्तगत केली होती.

विजयानंतर सरपंच, उपसरपंचपदांचे कार्यकाल निश्चित केले गेले. दोन्हीकडच्या नेतेमंडळींनी खलबते करून कारभारी निश्चित केले. त्यानुसार निवडी झाल्या. वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहिल्याने सत्ताधारी गटात मतभेद, रुसवे- फुगवे सुरू झाले. सरपंच निवडीला वर्ष होतानाच पदाधिकारी बदलाच्या चर्चेने जोर धरला. मात्र, योग्य तोडगा निघालाच नाही. त्यातून धुसफूस व गैरसमज वाढून त्याचे पर्यावसन पक्षांतरात झाले. विद्यमान उपसरपंच पवेकर व दोन ग्रामपंचायत सदस्य प्रणिल यादव, किरण सोनावले या तिघांनी शिवसेनेत प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला. त्यामुळे ग्रामपंचायतीत सेनेचे दहा सदस्य, तर राष्ट्रवादीचे सात सदस्य झाले आहेत.

राजकीय द्वंद्व रंगणार...

तारळे ग्रामपंचायतीत शिवसेना बहुमतात, तर सरपंच असलेली राष्ट्रवादी अल्पमतात आली आहे. मात्र, तांत्रिकदृष्ट्या सत्ता राष्ट्रवादीकडेच राहणार आहे. कारण दोन वर्षे सरपंचांवर अविश्वास आणता येत नाही. बहुमत विरुद्ध अल्पमत, सरपंच विरुद्ध उपसरपंच असे राजकीय द्वंद्व रंगण्याबरोबरच शह-काटशहाचे राजकारण होण्याची चिन्हे आहेत. आगामी काळात ग्रामपंचायतीचा कारभार कसा चालणार, बहुमताच्या आधारे उपसरपंच कारभार चालवणार का, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT