Papya tree system
सातारा

वादळाने माझी बाग पाचोळ्या सारखी उडवून टाकली हो...!

काबाड कष्टाने कमावलेली फळबाग झरकन डाेळ्यासमाेर भुईसपाट झाल्याने पाटील कुटुंबीयांना धक्का बसला आहे.

अशपाक पटेल

खंडाळा (जि. सातारा) : हो, मी अन आमच्या कुटुंबाने स्वप्न (dream) पाहिले होते. चांगली शेती (farming) करून मुलांना चांगले दिवस दाखवता येतील, असे वाटले. म्हणून माळावरील खडकाशी धडका घेत अहोरात्र कष्ट केले. घाम गाळून हिरवीगार पपईची बाग (papaya garden) फुलविली. पण... अरबीसमुद्रावरून आलेल्या वादळाने (cyclone) माझी बाग पाचोळ्या सारखी उडवून टाकली हो...! (tauktae cyclone effect loss papaya garden khandala farmer satara marathi news)

वाण्याच्यावाडीतील नारायणरावाची एकरातील पपईची बाग वादळाने भुईसपाट केली हे सांगताना त्यांना अश्रु अनावर झाले होते. रविवारपासून मंगळवारपर्यंत ताैक्ते वादळाचा फटका पश्चिम महाराष्ट्रासह, काेकण, मुंबईला बसला. वादळी, वा-यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले. वादळी वा-यामुळे पावसामुळे शेतपिकाबरोबर फळझाडांचेही मोठे नुकसान झाल्याने शेतकरीवर्ग हवालदील झाला आहे. पारगाव येथील नारायणराव पाटील यांची फळबाग जमीनदाेस्त झाली आहे. पपईची झाडे उन्मळुन पडली आहेत. काबाड कष्टाने कमावलेली फळबाग झरकन डाेळ्यासमाेर भुईसपाट झाल्याने पाटील कुटुंबीयांना धक्का बसला आहे.

वडिलापार्जित आलेल्या शेतीतून काही तरी चांगलं करुन यासाठी 15 लाख रुपये खर्चले हाे. पण काय मिळाले हातात असे बाेलून नारायणरावांनी अश्रुंना वाट माेकळी करुन दिली. काय सांगयाच तुम्हांला अहाे! वाण्याचीवाडी शिवारात मोठे टेकाडावर असलेले ही शेतजमीन कधीही कसायला आली नव्हाती. संपुर्ण टेकडीचे जेसीबीच्या साहाय्याने सपाटीकरण करुन घेतले. त्यानंतर येथे जवळच असणाऱ्या अजनुजच्या तलावातील 45 टँक्टर माती आणुन शेतजमीनीत चार फुटाचा काळ्या मातीचा थर टाकला. दहा लाख रुपये खर्च आला.

शेतपिकासाठी गेल्यावर्षी विहीर खाेदली. विहीरीला पाणी लागेल का याची चिंता हाेती आम्हांला पण धोम बलकवडी कॅनॉल लगत क्षेञ असल्याने लागले विहीरीस पाणी. दाेन लाख खर्च झाले दादा याला बरं का. नारायणरावांनी प्रत्येक गाेष्टीचा हिशाेब ठेवला हाेता हे यातून जाणवले. पाणी भरपूर लागल्याने आम्ही फळबाग करण्याचे ठरविले. पपई व कलिगंड फळपीक यावर्षी या शेतजमीनचे पहिलेच पीक आले. यातुन काहीतरी उत्पन्न होईल अशी अपेक्षा होती.

पपईचे दर ही चांगले असल्याने यातील भांडवल वसुल होईल असे वाटत हाेते पण...पुढचं सांगताना नारायणरावांचा ऊर भरुन आला. वादळ आलं अन् हातातोंडाशी आलेले पीक भुईसपाट झाले हाे. पाेटच्या पाेरासारखं सांभाळ करत हाेताे. काय करणार असं म्हणत नारायणराव ढसा ढसा रडू लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: चंदगड मतदारसंघात शिवाजी पाटीलआघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT