महाबळेश्वर (सातारा) : मुंबईतील ठाण्यातून घरी कोणाला काहीही न सांगता 18 जून रोजी बेपत्ता झालेला हर्ष रामू गौडा (वय 20 रा. शिवाई नगर, ठाणे) या युवकास महाबळेश्वर पोलिसांनी (Mahabaleshwar Police Station) शोध घेतला आणि त्याच्या मित्रांबरोबर त्याला ताब्यात घेवून त्यांची पुन्हा ठाण्याला रवानगी केली. (Thane Police With The Help Of Panchgani And Mahabaleshwar Police Searched For Harsh Gowda)
घरातील लोकांनी काळजीपोटी तो हरविल्याची तक्रार पोलिसात दाखल केली. परंतु, तो खरच बेपत्ता झाला होता की, त्याच्याच मित्रांनी त्याचे काही कारणासाठी अपहरण केले होते, हे ठाणे पोलिसांच्या तपासात समोर येईल.
या बाबत महाबळेश्वर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हर्ष हा आपल्या कुटुंबाबरोबर ठाण्यातील शिवाई नगर येथे राहतो. 18 जून रोजी तो ठाण्यातून बेपत्ता झाला. एक दिवस त्याच्या घरच्यांनी तो घरी पुन्हा येईल म्हणून वाट पाहिली, परंतु तो आला नाही. म्हणून, हर्षची आई सपना रामू गौडा यांनी ठाण्यातील वर्तक नगर पोलिस ठाण्यात आपला मुलगा हरविल्याची तक्रार दाखल केली. ठाणे पोलिसांनी (Thane Police Station) मिसिंग दाखल (Missing Case) करून हर्षचा शोध सुरू केला तर, दुसरीकडे हर्षचा मोबाईल नंबर ट्रॅक (Track mobile number) केला. हर्षचा मोबाईल त्या दिवशी बंद होता. दोन दिवस ठाणे पोलिसांनी हर्षच्या मित्रांची माहिती गोळा केली. त्या वेळी हर्षचे काही मित्र देखील शहरात नसल्याचे व त्यांच्या सोबत एक सफेद रंगाची स्कोडा गाडी देखील आहे, ही माहिती पोलिसांच्या हाती लागली.
हर्षने आपला मोबाईल दोन दिवसांनी सुरू केला. मोबाईल सुरू होताच, त्याचे मोबाईल टॉवरचे लोकेशन (Tower location) हे पोलिसांना मिळाले. त्या आधारे ठाणे पोलिसांनी हर्ष गौडा व त्याच्या मित्रांची सर्व माहिती पांचगणीचे पालिस उपनिरीक्षक सतीश पवार (Panchgani Police Sub-Inspector Satish Pawar) यांना कळविली. हर्ष व त्याच्या मित्रांचा फोटो त्यांच्या सोबत असलेल्या गाडीचा नंबर व सर्वांचे मोबाईल नंबर अशी माहिती पांचगणी पोलिसांना मिळताच, त्यांनी देखील परिसरात शोध सुरू केला. दरम्यान, पांचगणी पोलिसांनी हर्षची सर्व माहिती महाबळेश्वर पोलिसांकडे देखील वर्ग केली. महाबळेश्वर पोलिसांनी शहर व परिसरातील सर्व खाजगी बंगलो, लॉज व हॉटेल येथे हर्ष व त्याच्या मित्रांची चौकशी सुरू केली.
महाबळेश्वरपासून सात कि.मी अंतरावर महाबळेश्वर-पांचगणी रस्त्यावर मेट गुताड गावात एका हॉटेल बाहेर सफेद रंगाची स्कोडा ही गाडी महाबळेश्वर पोलिसांना आढळली. त्यांनी अधिक चौकशी केली असता, हर्ष हा आपल्या मित्रांबरोबर महाबळेश्वर येथे सहलीसाठी आल्याचे तपासात समोर आले. महाबळेश्वर पोलिसांनी हर्ष व त्याच्या मित्रांना ताब्यात घेतले व ही सर्व माहिती ठाणे पोलिसांना कळविली. महाबळेश्वर पोलिसांनी पाठविलेले फोटो व माहितीची खात्री पटल्यानंतर वर्तक नगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ए. ए. शहा हे पोलिस पथकासह महाबळेश्वरकडे रवाना झाले.
ठाण्याचे पोलिस पथक 21 जून रोजी रात्री उशिरा महाबळेश्वर येथे दाखल झाले. सर्व कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण करून ठाणे पोलिसांनी हर्ष व त्याच्या मित्रांना सोबत घेवून पहाटे ठाण्याला रवाना झाले. हर्ष हा घरात कोणाला काहीही न सांगता बाहेर पडला व तो मित्रांबरोबर महाबळेश्वरला आला. दरम्यान, घरातील लोकांनी काळजीपोटी तो हरविल्याची तक्रार पोलिसात दाखल केली. परंतु, तो खरच बेपत्ता झाला होता की, त्याच्याच मित्रांनी त्याचे काही कारणासाठी अपहरण केले होते हे ठाणे पोलिसांच्या तपासात समोर येईल, अशी माहिती वर्तक नगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शहा यांनी पत्रकारांना दिली.
Thane Police With The Help Of Panchgani And Mahabaleshwar Police Searched For Harsh Gowda
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.