Kas flower plateau esakal
सातारा

पर्यटकांना खुशखबर! कास पुष्प पठारावरील 'लॉकडाउन' उठणार?

फुलांचा हंगाम पर्यटकांसाठी खुला करावा

सूर्यकांत पवार

कास (सातारा) : कोरोनाच्या संकटामुळे (Coronavirus) गतवर्षीपासून लॉकडाउनमध्ये (Lockdown) असलेली कासची रंगीबेरंगी फुलांची दुनिया चालू वर्षाच्या अनलॉक प्रक्रियेत तरी कासचा लॉकडाउन उठणार का, असा प्रश्‍न निसर्गप्रेमी व स्थानिक व्यावसायिक विचारत आहेत. नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांची उधळण होऊन अनोख्या अविष्काराने सजणारे, दरवर्षी लाखो पर्यटकांच्या नजरेचे पारणे फेडणाऱ्या कास पुष्प पठारावरील (Kas flower plateau) फुलांच्या कळ्या उमलण्यास सुरवात होऊ लागली आहे. पठारावरील निसर्ग हंगामासाठी सज्ज होताना दिसत आहे.

कोरोनामुळे दीड वर्षापासून पर्यटनावर बंदी असल्याने गेल्या वर्षीचा कास पठारावरील फुलांचा हंगाम पर्यटकांसाठी खुला करता आला नाही.

मात्र, पर्यटकांना पर्यटनासाठी परवानगी यावर्षी तरी मिळणार का, असा प्रश्न उपस्‍थित होत असून या वर्षीचा हंगाम पर्यटकांसाठी खुला करावा, अशी मागणी पर्यटकांसह व्यावसायिकांतून होत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दीड वर्षापासून पर्यटनावर बंदी असल्याने गेल्या वर्षीचा कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम पर्यटकांसाठी खुला करता आला नाही. त्यामुळे संयुक्त व्यवस्थापन समितीला कोट्यवधींच्या उत्पन्नाचा फटका बसला.

परिसरातील व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली, तर अनेकांचे रोजगार गेले. पर्यटकांनाही निसर्गाचा आनंद लुटत आला नाही. त्यामुळे कोरोनाच्या लॉकडाउनमुळे घरात कोंडलेले पर्यटक, पर्यटनावर अवलंबून असलेले छोटे- मोठे व्यावसायिक, कामगारांसह सयुंक्त वन व्यवस्थापन समितीकडून प्रशासनाने नियमावली बनवून १५ ते २० दिवसांवर येऊन ठेपलेला व दोन महिने चालणारा कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम पर्यटकांसाठी खुला करावा, अशी मागणी होत आहे.

पावसाच्या उघडझापीने रानफुले बहरली

या भागात मोठा पाऊस कमी झाला असून श्रावणातल्या उघडझापीने नैसर्गिक रंगीबेरंगी फुलांच्या कळ्या उमलण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामध्ये रान हळदीच्या पांढऱ्या रंगाची फुले मोठ्या प्रमाणात बहरली आहेत. तेरडा, गेंद, रानगवर, सोनकी, आम्री, निलीमा, कापरू, टुथब्रश, आबोलिमा आदींसह अनेक शेकडो जाती-प्रजातीच्या फुलांच्या कळ्या तयार होऊ लागल्याचे दिसत आहे. त्यातच मुसळधार पावसाने उघडीप दिली असल्याने ऊन-पावसाच्या खेळामुळे सप्टेंबरच्या प्रारंभीलाच पठारावर फुलांचे गालिचे तयार होऊन निसर्गाचा अनमोल नजराणा पाहायला मिळेल, असा नजारा तयार झाला आहे.

जिल्‍ह्यात कोरोनाचा पॉझिटिव्‍हिटी रेट अद्याप खाली आलेला नाही. कोठेही पर्यटनाला परवानगी नाही. १५ ऑगस्टदरम्यान कोरोनाचा आकडा कमी आल्यास व जिल्हाधिकाऱ्यांनी नियमांत शिथिलता दिल्यास येणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीचा विचार करून कास पठाराच्या हंगामाचा विचार केला जाईल. अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

-महादेव मोहिते, उप वनसंरक्षक, सातारा

येत्या १५ ते २० दिवसांत फुलांच्या बहराला प्रारंभ होईल. पर्यटकांना फुले पाहण्यासाठी पठार खुले करून हंगामा चालू करण्यासंदर्भात अद्याप कोणत्याही सूचना वन विभागाकडून आल्या नाहीत. मात्र, कोरोनाची नियमावली करून दररोज ऑनलाइन परवानगीने लिमिटेड पर्यटकांसाठी पठार सुरू करण्यास परवानगी दिल्यास नियमांची अंमलबजावणी करून हंगाम पार पाडू.

-सोमनाथ जाधव, सदस्य, संयुक्त व्यवस्थापन समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT