Siddhanath Temple Area esakal
सातारा

माणगंगा नदीपात्रातील तब्बल 800 वर्षांपूर्वीच्या स्नानकुंडाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष!

सल्लाउदीन चाेपदार

म्हसवड (सातारा) : महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटकातील (Andhra Pradesh-Karnataka) असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री सिध्दनाथ (Siddhanath Temple), देवी जोगेश्वरी देवस्थानचे माण नदीपात्रातील पुरातन तीर्थ स्नानकुंडाचे पालिकेने तीर्थक्षेत्र विकास निधीतून (Development Fund) बांधकाम करून जीर्णोध्दार करावा, अशी मागणी येथील माणरत्न सोशल फाउंडेशनतर्फे निवेदनाद्वारे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांच्याकडे केली आहे. (The Poor Condition Of The 800 year old Siddhanath Temple Area Near The River Manganga)

सध्या या दगडी बांधकामातील स्नानकुंडाची दुरवस्था झाली असून पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे.

यावेळी फाउंडेशनचे लखन मंडले, सागर शिंदे, सुशांत तवटे, सद्दाम पटेल, विशाल नवगण उपस्थित होते. येथील सिध्दनाथ मंदिराच्या पाठीमागील बाजूस माणगंगा नदीपात्रामध्ये सुमारे 800 वर्षांपूर्वी दगडी बांधकाम केलेले पुरातन स्नानकुंड तीर्थ असून हे ठिकाण "श्रीं'चे तीर्थ म्हणून परिचित आहे. येथील "श्रीं'च्या मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक श्रध्देने या तीर्थ कुंडातील माण नदीच्या जलाने स्नान करून मंदिरात दर्शनासाठी जाण्याची परंपरा होती.

Siddhanath Temple

सध्या या दगडी बांधकामातील स्नानकुंडाची दुरवस्था झाली असून पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. माण नदीपात्रात सिमेंट बंधारे बांधकाम झाल्यामुळे तीर्थस्थळी पुरेसे पाणी उपलब्ध असते. या तीर्थानजीकच दगडी बांधकामातील हेळ असून त्यामध्ये वाळू व गाळ साचून ते नदीपात्रात पूर्णत: गाडले गेले आहे. या ऐतिहासिक हेळातील साचलेला गाळ व वाळूउपसा करून त्याचीही दुरुस्ती करून भाविकांसाठी वापरास खुले करावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

The Poor Condition Of The 800 year old Siddhanath Temple Area Near The River Manganga

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT