Synthetic Hua Court esakal
सातारा

Good News : कऱ्हाडात होणार आंतरराष्ट्रीय हुवा कोर्ट

सचिन शिंदे, हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवरील (Chhatrapati Shivaji Stadium) बॅडमिंटन कोर्टवर (Badminton court) आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिंथेटिक हुवा कोर्ट (Synthetic Hua Court) बसवण्याची मागणी लोकशाही आघाडीने (Lokshahi Aghadi) पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Minister Balasaheb Patil) यांच्याकडे केली होती. त्यानुसार या कोर्टचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी २० लाखांचा खर्च मंजूर आहे. या कोर्टमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार होण्यासाठी हातभारही लागणार आहे. (There Will Be An International Level Synthetic Hua Court At Karad Satara Sports News)

या कोर्टमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार होण्यासाठी हातभारही लागणार आहे.

येथे वुडन कोर्टवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे हुवा कोर्ट असावे, अशी मागणी बॅडमिंटन क्लबकडून पालकमंत्र्यांकडे केली होती. लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांनी सहकाऱ्यांसह पाहणी करून पालकमंत्र्यांकडे तो विषय नेला होता. सध्याचे बॅडमिंटन कोर्ट २५ वर्षे जुने आहे. तेथे वुडन कोर्टवर खेळाडू सराव करतात. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सिंथेटिक हुवा कोर्टवरच्या सरावाची गरज असते. त्यामुळे कऱ्हाड बॅडमिंटन क्लबने पालकमंत्र्यांकडे सिंथेटिक हुवा कोर्टची मागणी केली होती. त्यानुसार डीपीडीसीतून प्रस्ताव मंजूर करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. या कामास २० लाखांपेक्षा जास्त खर्च येणार आहे. हा निधी मंजूर झाला आहे.

शहरास सर्वोत्तम सुविधा देण्यास पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील लोकशाही आघाडी सदैव प्रयत्नशील राहील. यापुढे कामे मंजूर करण्यासाठी प्रयत्नशील राहू.

-सौरभ पाटील, गटनेते, लोकशाही आघाडी, कऱ्हाड

There Will Be An International Level Synthetic Hua Court At Karad Satara Sports News

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT