कोरेगाव (जि. सातारा) : एकंबे (ता. कोरेगाव) परिसरातील एका निवासी शाळेतील 33 विद्यार्थी कोरोनाबाधित आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी नुकतीच संबंधित शाळेस भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली आणि उपाययोजनेसंदर्भात आवश्यक सूचना केल्या.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 23 तारखेला या शाळेची सहल सातारा परिसरात गेली होती. त्यानंतर गेल्या पाच तारखेला दोन विद्यार्थ्यांना पाचगणी येथील बेल एअर हॉस्पिटलमध्ये किरकोळ आजाराच्या तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यापैकी एक जण रॅट पॉझिटिव्ह आढळून आला, तर दुसऱ्याचा आरटीपीसीआर अहवाल पॉझिटिव्ह आला.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी (ता. सहा) शाळेतील सर्व 43 विद्यार्थी व 16 कर्मचारी, अशा एकूण 59 जणांपैकी 58 जणांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. त्यात 33 विद्यार्थी बाधित आढळून आले आहेत. त्यापैकी चौघांना सातारा येथील जंबो कोविड रुग्णालयात, तर एकाला बेल एअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. होम आयसोलेशनमध्ये 28 जण असून, त्यांच्यावर तडवळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत प्रथमोपचार करण्यात आला आहे. बाधित नसलेल्या विद्यार्थ्यांवर प्रतिबंधात्मक औषधोपचार करण्यात आले आहेत. शाळेमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे नियंत्रण पथक कार्यरत असून, संपूर्ण शाळेचे निर्जंतुकीकरण केल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जाधव यांनी दिली.
बाळूपाटलाच्या वाडीतील युवकाचा मारहाणीत मृत्यू
Edited By : Siddharth Latkar
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.