Tree esakal
सातारा

खबरदार! आता जुनी झाडं तोडाल, तर होणार लाखाचा दंड

सिद्धार्थ लाटकर/ सचिन शिंदे

कऱ्हाड (सातारा) : पालिकांच्या (Karad Municipality) हद्दीतील प्राचीन, अतिप्राचीन वृक्षांचे संवर्धन, संरक्षणासाठी ‘हेरिटेज ट्री’ (Heritage Tree) संकल्पना शासन राबवत आहे. प्राचीन किंवा अति प्राचीन वृक्ष आता सहजासहजी तोडता येणार नाहीत. शहरात ५० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या वृक्षांना ‘हेरिटेज ट्री’चा दर्जा देऊन त्याला शासनाने संरक्षण आणि संवर्धनाचे कवच दिले आहे. त्याची जबाबदारी पालिकांवर दिली आहे. पालिकांनी प्रति पाच वर्षाला जुन्या वृक्षांची गणना करून नोंदी ठेवण्याची सक्ती केली आहे. प्राचीन वृक्ष (Ancient tree) तोडणाऱ्यांस एक लाख किंवा वृक्षाच्या वय निश्‍चितीनुसार त्याहून अधिक दंडाच्या शिक्षेची तरतूद केली आहे. (Those Who Cut Down Old Trees Will Be Fined One Lakh Satara Marathi News)

पालिकांच्या हद्दीतील प्राचीन, अतिप्राचीन वृक्षांचे संवर्धन, संरक्षणासाठी ‘हेरिटेज ट्री’ संकल्पना शासन राबवत आहे.

राज्यातील पालिकांनी स्थानिक वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन करण्याचे निर्देशही आहेत. पालिकांचे मुख्याधिकारी त्या समितीचे अध्यक्ष असतील. हेरिटेज ट्री संकल्पना (Heritage Tree Concept) राबविण्यासाठी पालिकांचे क्षेत्र गृहित आहे. तेथील वृक्ष संरक्षण व संवर्धनाच्या नियमातही सुधारणा केली आहे. वृक्षांचे वय, भरपाई, वृक्षारोपण, वृक्षतोड, राज्य व स्थानिक वृक्ष प्राधिकरण स्थापना, त्यांची कर्तव्ये, कार्य, वृक्ष गणना, लागवडीचे निर्देश निश्चित करून वृक्षांचे पुनर्रोपणाचा त्यात समावेश आहे. शहरी हद्दीतील वृक्षतोड लक्षात घेऊन ही योजना राबवली आहे.

Old Trees

५० किंवा त्याहून अधिक वयाची २०० हून अधिक झाडे तोडता येणार नाहीत. तो त्याचा प्रस्ताव राज्य वृक्ष प्राधिकरणाकडे पाठवण्याची सक्ती आहे. त्यावर सुनावणी होऊन ठरवले जाणार आहे. वृक्षतोड रोखण्यासाठी पुन्हा स्थानिक वृक्ष प्राधिकरणाला विनंतीची मुभा ठेवली आहे. वृक्ष तोडल्यास त्याच्‍या भरपाईचेही धोरण निश्‍चित आहे. तोडलेल्या वृक्षांच्या वयाच्या संख्येएवढी त्याच जागेवर नवीन आठ फुटांचे वृक्ष लावण्याची सक्ती आहे. त्यांना टॅगिंग करून सात वर्षांपर्यंत संगोपनाची जबाबदारी संबंधितांवर राहणार आहे. वृक्ष लागवड शक्य नसल्यास तोडलेल्या वृक्षांच्या मूल्यांकनाएवढी रक्कम दंड म्हणून जमा करण्याचेही निर्देश आहेत.

काय आहे, हेरिटेज ट्री संकल्पना

शहरात ५० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची जितके वृक्ष आहेत, त्यांना हेरिटेज ट्री म्हणजे प्राचीन वृक्ष म्हणून परिभाषित केले आहे. ही संकल्पना पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे राबवले जाणार आहे. त्यात वृक्षांच्या प्रजाती वेळोवेळी अधिसूचित केल्या जातील. हेरिटेज अंतर्गत वृक्षाचे वय ठरविले जाणार आहे. त्यासाठी वन विभागाच्या प्रचलित पद्धतींचा वापर केला जाणार आहे. त्यानुसार हेरिटेजचा दर्जा दिला जाणार आहे. भरपाईच्या बदल्यात वृक्षारोपणात लागवडीच्या वृक्षांची संख्या निश्चित करण्यासाठी प्राचीन वृक्षाचे वय महत्त्‍वाचे पैलू आहे.

Those Who Cut Down Old Trees Will Be Fined One Lakh Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: धंगेकरांवर रासने यांनी घेतली आघाडी, तिसऱ्या फेरी अखेर कसब्यात उलटफेर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंना फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT