ATm Blow UP sakal
सातारा

कऱ्हाडात थरार; स्फोटकाने एटीएम फोडण्याचा प्रयत्न; चार पोलिस जखमी

बँक ऑफ इंडियाचे एटीएम जिलेटिनचे स्फोटक लावून फोडण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेने फसला. दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत तीन पोलिस जखमी झाले.

सकाळ वृत्तसेवा

बँक ऑफ इंडियाचे एटीएम जिलेटिनचे स्फोटक लावून फोडण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेने फसला. दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत तीन पोलिस जखमी झाले.

कऱ्हाड - सैदापुरातील गजानन हाउसिंग सोसायटीतील बँक ऑफ इंडियाचे एटीएम जिलेटिनचे स्फोटक लावून फोडण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेने फसला. दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत तीन पोलिस जखमी झाले. दरोडेखोरांनी डोळ्यात सेल्फ डिफेन्स पेपर स्प्रे फवारला. तरीही एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले. त्याच्याकडून दुचाकीसह चार पेट्रोल बॉम्ब जप्त केले आहेत. एटीएममध्ये टाकलेले जिलेटिनचे स्फोटक पोलिसांनी तब्बल नऊ तासांनी सुरक्षितपणे उडवले. एटीएम मशिनमध्ये आठ लाख ७६ हजार ५०० रुपये सुरक्षित सापडले. पोलिस अधीक्षकांनी दरोडेखोरांशी झुंजणाऱ्या चारही कर्मचाऱ्यांचा प्रत्येकी दहा हजारांचे रोख पारितोषिक देऊन सन्मानही केला.

सचिन अशोकराव वाघमोडे (वय ३८, रा. आदर्शनगर, काळेवाडी, पुणे, मूळ रा. परळी वैजनाथ, जि. बीड) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून मोटारसायकल, चार पेट्रोल बॉम्ब असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. जखमी पोलिसांवर कृष्णा रुग्णालयात उपचार करण्यात आले. शुभंतू अशोक पोळ (वय २८, रा. करवडी, ता. कऱ्हाड), अशोक झांबरे (वय ३५, रा. नगर) व महाराज (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) यांच्यावर गुन्हा दाखल आहे. सैदापुरातील गजानन हाउसिंग सोसायटीतील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम शाखेत मशिनवर पेपर स्प्रे मारण्यात आला. ते मशिन फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे संकेत बँकेच्या सिस्टिमवर समजले. तेथून लगेच शहर पोलिसांना त्याची माहिती देण्यात आली. वायरलेसवरूनही ती माहिती देण्यात येत होती. पहाटे अडीचच्या सुमारास शहर पोलिसांनी रात्रगस्त घालणाऱ्या पोलिसांना त्याची माहिती दिली. त्या भागात गस्त घालणाऱ्या दामिनी पथकातील हवालदार जयसिंग राजगे, सचिन सूर्यवंशी, संग्राम पाटील, होमगार्ड निकम हे काही वेळातच घटनास्थळी पोचले. पोलिस आल्याचे दिसताच संशयितांनी त्यांच्यावर हल्ला करत धक्काबुक्की केली. पोलिसांच्या डोळ्यात विषारी पेपर स्प्रे फवारण्यात आला. तेथून पळून जाताना पोलिस व चोरट्यांमध्ये झटापट झाली.

डोळ्यात स्प्रे मारल्याने पोलिस जखमी झाल्याचा फायदा घेऊन तीन चोरटे पसार झाले. जखमी अवस्थेत जिगरबाज हवालदार जयसिंग राजगे यांनी एका चोरट्याला पकडून ठेवले. तोपर्यंत अन्य फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला‌. पोलिसांनी पकडलेल्या चोरट्याला ताब्यात घेतले. जखमी जयसिंग राजगे, सचिन सूर्यवंशी, संग्राम पाटील व निकम यांना कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी घटनास्थळी भेट दिली. पळून गेलेल्या चोरट्यांच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत. पोलिसांनी प्रसंगावधान राखत दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबत कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे तपास करत आहेत. पोलिस अधीक्षकांनी जखमी चारही पोलिस कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव केला. प्रत्येक कर्मचाऱ्याला दहा हजारांचे रोख पारितोषिक देऊन त्यांचा सन्मानही केला.

जिलेटिनच्या स्फोटाने परिसर हादरला

गजानन हाउसिंग सोसायटीतील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्यासाठी चोरट्यांनी वापरलेल्या जिलेटिनच्या कांड्यांचा पोलिसांनी अखेर नऊ तासांनंतर स्फोट केला. बॉम्बशोध व नाशक पथकाच्या तंत्रज्ञांनी त्यासाठी प्रयत्न केले. पोलिसांनी तो भाग निर्मनुष्य करून त्या कांड्यांचा स्फोट केला. त्यासाठी त्या भागाकडे येणारी वाहतूक ओगलेवाडी व कृष्णा कॅनॉल चौकात वळवण्यात आली होती. दुपारी बाराच्या सुमारास जबरदस्त स्फोटाव्दारे त्या कांड्या उद्‌ध्वस्त करण्यात आल्या. स्फोटानंतर त्या मशिनमध्ये ५०० रुपयांच्या एक हजार ७५३ नोटा सापडल्या. त्यातील पाच नोटा जळाल्या होत्या. आठ लाख ७६ हजार ५०० रुपये पोलिसांच्या पंचनाम्यात सुरक्षित होते. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT