Tomato esakal
सातारा

Tomato Rate : टोमॅटो आमचे, दरही आमचाच..! शेतकऱ्यांकडून अनोखी संकल्पना; रोज निश्चित केला जातो भाव

कोरेगाव तालुक्यातील तडवळे संमत कोरेगावातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी ‘आमचे टोमॅटो,दरही आमचा..!’ ही संकल्पना यशस्वीपणे राबवली आहे.

पांडुरंग बर्गे

कोरेगाव - तालुक्यातील तडवळे संमत कोरेगावातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी ‘आमचे टोमॅटो,दरही आमचा..!’ ही संकल्पना यशस्वीपणे राबवली आहे. ते स्वतः भांडवल घालून, ऊन, वारा, थंडी पावसात अपार कष्ट करून उत्पादित केलेल्या आपल्या मालाचा दर स्वतःच ठरवत आहेत.

कोरेगाव तालुक्यात शहरासह जवळ असलेली तडवळे संमत कोरेगाव, कुमठे, खेड- नांदगिरी, जळगाव, भोसे, सांगवी, सुलतानवाडी, तसेच सातारारोड आदी गावे मोठी बागायती आहेत. या गावांमध्ये प्रगतशील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात नगदी पीक असलेल्या ऊस, आल्यासह टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, वांगी आदी तरकारी भाजीपाला घेतो.

दररोज ट्रक भरून तरकारी मुंबई, वाशीसह इतर मार्केटमध्ये जाते; परंतु रोज मार्केटमध्ये जाणाऱ्या मालाला चांगला दर मिळतोच, असे नाही. मार्केटमध्ये मालाची आवक-जावक लक्षात घेऊन दर ठरत असतो. त्यामुळे दराची शाश्वती नसते.

या पार्श्वभूमीवर दरवर्षी सुमारे ७० ते ७५ एकर टोमॅटोचे उत्कृष्ट उत्पादन घेणाऱ्या तडवळ्यातील शेतकरी वर्गाने आपल्या टोमॅटोला चांगला आणि तोही सर्वांना समान दर मिळावा, यासाठी एक अनोखी संकल्पना राबवलेली आहे. ती म्हणजे ‘आमचे टोमॅटो, दरही आमचा..!’

तडवळ्यात ‘आमचे टोमॅटो, दरही आमचा..!’ या संकल्पनेनुसार दररोज सकाळी टोमॅटो उत्पादक शेतकरी आणि टोमॅटो खरेदीदार व्यापारी वर्गाची एकत्र बैठक तडवळे बस थांब्यावर घेतली जाते. प्रारंभी त्यात सर्वांसमोर तडवळे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच मोहनराव माने यांच्यासह प्रमुख मंडळी मुंबई, वाशी व इतर मार्केटमध्ये मोबाईलवरून टोमॅटोच्या विविध वाणांनुसार ३० किलो कॅरेटच्या दराची चौकशी करतात. तेथे सुरू असलेला दर सर्वांसमोर जाहीर केला जातो. त्यानंतर उपस्थित व्यापाऱ्यांना वाणांनुसार टोमॅटोच्या खरेदी दराबाबत आपली बोली करण्याचे आवाहन केले जाते. त्यानुसार मग व्यापाऱ्यांकडून खरेदीची बोली सुरू होते.

प्रत्येकजण आपापला दर सांगतो. शेतकरी त्या दरावर चर्चा करतात. कोणी दर कमी होतोय, कोणी अजून जास्त दर मिळावा, असे मत व्यक्त करतात, तर व्यापारी दर जास्त होतोय, मार्केटपर्यंत माल जाईतोवर तो टिकला पाहिजे, मार्केट कायम राहिले पाहिजे, अशा अडचणी बोलून दाखवतात. अखेर सर्वसंमतीने त्या एका दिवसाचा वाणांनुसार टोमॅटोचा दर निश्चित करून तो जाहीर केला जातो. मग त्यानुसार त्या दिवशी दिवसभर माल खरेदी केला जातो. तडवळ्यात रोज सकाळी निघणारा दर कोरेगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळतो, ही बाब आणखी जमेची ठरते.

तडवळेत आज निघालेला टोमॅटोचा दर... (३० किलो)

  • आर्यमान वाण : दर १३७५ रुपये

  • अथर्व वाण (नवीन) : १२७५ रुपये

तडवळेत दररोज सकाळी मी गावातील टोमॅटो उत्पादक आणि व्यापाऱ्यांना मोबाईलवर कॉल करून बैठकीची आठवण करून देतो. त्यानंतर वेळेत बैठक होऊन टोमॅटोचा दर सर्वानुमते ठरतो. यातून शेतकरी आणि व्यापारी वर्गाचेही हित साधले जाते.

- मोहनराव माने, लोकनियुक्त सरपंच, तडवळे संमत कोरेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT