खंडाळा (जि. सातारा) : पुणे बंगळूर महामार्गावरील खंबाटकी घाटात मुबंईहुन केरळला जाणारा कंटनेर (केए 51 एएफ 9365) पलटी होऊन 20 फुट खोल दरीत कोसळला. शुक्रवारी रात्री साडे बाराच्या सुमारास झालेल्या या अपघातात काेणाला ही दुखापत झालेली नाही.
मुबंईहुन खजुर (खारीक) भरुन केरळच्या दिशेने कंटेनर निघाला होता. खंबाटकी घाट चढत असताना पाचव्या वळणावर हा अपघात झाला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पाेलिसांनी दिली.
पुण्याला निघालेल्या जोशी कुटुंबीयांवर काळाचा घाला; बोरगावनजीक मोटार अपघातात एकाचा मृत्यू
दरम्यान कंटेनर पलटी होऊन 20 फुट दरीत कोसळल्याची माहिती समजताच खंडाळ्याच्या पोलिस गिरीष भोईटे, प्रशांत धुमाळ हे घटनास्थळी गेले. त्यांनी अपघातग्रस्त चालकाची विचारपूस केली. चालकास काेणतीही इजा झाली नव्हती. गेले दाेन दिवस खंबाटकी घाटात वाहनांची वर्दळ वाढली आहे. प्रवाशांनी सुरक्षित वाहन चालवावे असे आवाहन पाेलिसांनी केले आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.