Koregaon Accident Case esakal
सातारा

Hit and Run Case : कारच्या धडकेत बारा वर्षाच्या मुलीचा मृत्यू; गाडीची 15 फुटांवर जाऊन आणखी दोन दुचाकीस्वारांना धडक

सकाळ डिजिटल टीम

ड्रंक अँड ड्राईव्ह, हिट अँड रन (Hit and Run) असे हे प्रकरण असून या दुचाकीने पुढे १५ फुटांवर जाऊन आणखी दोन दुचाकीस्वारांना धडक दिली.

Koregaon Accident Case : कारची धडक बसल्याने कोलवडी (ता. कोरेगाव) येथे एका बारा वर्षे वयाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. काल रात्री साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, जान्हवी सतीश जगदाळे असे मुलीचे नाव आहे.

ग्रामस्थांचे म्हणणे आहे, की ड्रंक अँड ड्राईव्ह, हिट अँड रन (Hit and Run) असे हे प्रकरण असून या कारने पुढे १५ फुटांवर जाऊन आणखी दोन दुचाकीस्वारांना धडक दिली. ते दोघेही दुचाकीस्वार सातारा येथील यशवंत पाटील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल आहेत.

अपघात करणारी कार गाडी भीमनगर येथे एका उसाच्या शेतात आढळून आली असून, संबंधित दुचाकीस्वार फरारी आहे. सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये (Civil Hospital) शवविच्छेदन झाले आहे, पण संतप्त झालेल्या नातेवाइकांनी आरोपी अटक होईपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. सध्या कोलवडीचे ग्रामस्थ सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्येच थांबून आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND Vs New Zealand Test: भारतीय संघाची घोषणा; बुमराहची मोठी झेप! उप कर्णधारपदाची माळ पडली गळ्यात

Video: सत्तेला धरा, हीच विचारधारा!; सयाजी शिंदेंचं जुनं रिल अन् मिम्स व्हायरल

Latest Marathi News Updates: दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या सविस्तर

Sayaji Shinde NCP: "मी अनेक नेत्यांच्या भूमिका केल्या पण..."; राष्ट्रवादीत प्रवेशानंतर सयाजी शिंदेंनी मांडली भूमिका

IND vs NZ: भारताविरूद्ध घेणार आक्रमक पवित्रा; न्यूझीलंडच्या कर्णधाराने सांगितली रणनीती

SCROLL FOR NEXT