उंब्रज (जि. सातारा) : कोरिवळे (ता. कऱ्हाड) येथे अतिसारसदृश साथ पसरल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या तीन दिवसांत 27 रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. गावातील पिण्याच्या पाण्याच्या वाहिनीला दोन ठिकाणी गळती असल्याने साथ पसरल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कोरिवळे गावात गेल्या तीन दिवसांपासून अतिसारसदृश साथ सुरू असून, अनेक रुग्ण या साथीमुळे आजारी पडले आहेत. गावातील पिण्याच्या टाकीला झाकण नाही. पिण्याच्या पाण्याच्या नळास चावी नसल्याने पाइपमधून पाण्यात घाण मिसळत आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केल्याने नागरिकांना साथीच्या रोगास सामोरे जावे लागले आहे. गेल्या तीन दिवसांत 27 रुग्ण सापडले असल्याने नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गावातील मुख्य पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिनीला दोन ठिकाणी गळती झाली असून, यामध्ये दूषित पाणी मिसळत असल्याचे समोर आले आहे.
गाव कारभा-यांच्या निवडीसाठी सातारा जिल्ह्यात मतदान सुरु; 19 हजार 467 कर्मचा-यांची फाैज
यामुळे ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभाग खडबडून जागे झाले असून, आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिनीस दोन ठिकाणी गळती असल्याचे समोर आले असून, गळती काढण्याचे काम सुरू आहे. अतिसारसदृश साथीत नागरिकांना जुलाबाचा त्रास झाला असून, रुग्णांनी खासगीसह सरकारी रुग्णालयात उपचार घेतले आहेत. काही रुग्ण उपचार घेत आहेत. आरोग्य विभागासह ग्रामपंचायत प्रशासनाचे गावाला होणारा दूषित पाणीपुरवठ्यासह विहिरीचे पाणी तपासणीसाठी देण्यात आल्याची माहिती इंदोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. माने यांनी दिली.
कल्याण - मुंबई मटका जाेमात; पोलिसांनी छडा लावताच मुख्याधिका-यांचे कारवाईचे संकेत
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.