Two minor students attacked by 15-year-old school student with Koyata Shirwa of Satara District  sakal
सातारा

Satara Crime News : शिक्षकाकडे तक्रार अन् शाळकरी मुलाकडून कोयत्याने वार; 'मुळशी पॅटर्न'चा दिला दाखला

अशपाक पटेल

मागील बऱ्याच दिवसांपासून पुणे शहरात कोयता गँगची दहशत पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी कोयता दाखवून दहशत माजवल्याचे प्रकार समोर येत असतनाच सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात शिरवळ येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

एका शाळकरी मुलाने इतर दोन शाळकरी मुलांवर कोयत्याने वार केले आहेत. या घटनेत एका मुलाची दोन बोटे छाटली गेली आहेत. तर दुसऱ्यावर सात ते आठ वार करण्यात आले आहेत. याप्रकरणी शिरवळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले कि, शिरवळ येथील एका खासगी शाळेत शिकत असलेले हे विद्यार्थी शिक्षकांकडे तक्रार का केली? व ऐकमेकांना चाड्या का करतो? या किरकोळ कारणावरून शाळेतील चौदा आणि पंधरा वर्षीय दोन सख्ख्या भावंडांवर त्यांच्याच शाळेत शिकत असणाऱ्या एका पंधरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याने शाळा सुटल्यानंतर कोयत्याने हल्ला केला. शिरवळ शहरातील जुन्या गावठाण परिसरात शुक्रवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला.

या जीवघेण्या हल्ल्यात जखमी विद्यार्थ्यांपैकी १४ वर्षीय विद्यार्थ्याला अधिकच्या उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले. तर १५ वर्षीय विद्यार्थ्यावर शिरवळ येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

सदर घटनेची माहीती मिळताच शिरवळ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, सतिश आन्देलवार, अब्दुल बीद्री, पोलीस अंमलदार जितेंद्र शिंदे, प्रशांत धुमाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिरवळ पोलीसांनी विद्यार्थ्यांची माहीती घेत अवघ्या वीस मिनिटात हल्लेखोर संशयीतास ताब्यात घेतले. सदर घटनेची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात रात्री उशीरा दाखल झाली आहे. दरम्यान आज या अल्पवयीन मुलास न्यायालयात हजर करण्यात आले .

हल्ला का केला?

या घटनेमुळे शिरवळ परिसर हादरले असताना, या घटनेबद्दल पोलिसांनी विचारले, तु हल्ला का केला? यावर या अल्पवयीन मुलाने पोलिसांना सांगितले की, मुळशी पॅटर्न पिक्चरप्रमाणे सर्वात सुरक्षित ठिकाण म्हणजे पोलीस स्टेशन आहे. हे ऐकून पोलिसासह सर्व जण आचंबित झाले. दरम्यान या घटनेमुळे सध्या विविध घटनेवर आधारित असणाऱ्या चित्रपटांचा बालमनावर काय परिणाम होतो, याची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT