Udayanraje Bhosale criticized Sharad Pawar Uddhav Thackeray Maratha reservation jalna violence esakal
सातारा

Udayanraje Bhosale : मराठा आरक्षणावरून राजकारण नको; उदयनराजे भोसलेंची शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातील आंदोलनावेळी घडलेल्‍या घटनेचा निषेध करत न्‍यायालयीन चौकशीची मी मागणी केली

सकाळ वृत्तसेवा

सातारा : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातील आंदोलनावेळी घडलेल्‍या घटनेचा निषेध करत न्‍यायालयीन चौकशीची मी मागणी केली आहे. मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची देखील तीच भूमिका आहे. काहीजण या मुद्द्यावर कारण नसताना केवळ राजकारण करत असून, त्‍यांनी ते करू नये, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

दरम्यान, आरक्षणाच्‍या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्यांनी आरशासमोर उभे राहून स्‍वत:ला काही प्रश्‍‍न विचारावेत, अशी टीका त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांचा नामोल्लेख न करता केली.

अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणस्थळी पोलिसांनी केलेला लाठीहल्‍ला, गोळीबाराच्‍या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर तसेच आरक्षणाबाबत सर्वोच्‍च न्‍यायालयात सुरू असणारी प्रक्रिया तसेच मराठा आरक्षण उपसमितीच्‍या वतीने सुरू असणाऱ्या प्रयत्‍नांबाबत माहिती देण्‍यासाठी आज पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदिर येथे भेट घेतली.

यावेळी जिल्‍हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, इतिहास संशोधक व मराठा आरक्षण अभ्‍यासक चंद्रकांत पाटील आदी उपस्‍थित होते. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेली न्‍यायालयीन प्रक्रिया, उपसमितीचे प्रयत्‍न, क्‍युरेटिव्‍ह पिटीशनमध्‍ये नव्‍याने समाविष्‍ट करावयाच्‍या बाबींच्‍या अनुषंगाने शंभूराज देसाई व उदयनराजे यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली.

त्यानंतर मराठा आंदोलन व आरक्षणाच्या अनुषंगाने उदयनराजे पत्रकारांशी बोलत होते. ते म्‍हणाले, ‘‘आरक्षणाच्‍या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्यांनी मराठा समाजाला आरक्षण कसे मिळेल, यासाठी एकत्र येणे आवश्‍‍यक आहे. आरक्षणावर जे आता बोलत आहेत, जे राजकारण करत आहेत. त्‍यांनी ते थांबवणे आवश्‍‍यक आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही सगळ्यांची इच्‍छा आहे.’’

अंतरवाली सराटी येथील घटनेच्‍या अनुषंगाने कोण काय बोलत आहे, त्‍यावर मी बोलणार नाही. कारण प्रत्‍येकजण निवडणुका नजरेसमोर ठेवत मांडणी करणार; पण राजकारणापेक्षा मराठा समाजाची परिस्‍थिती तुम्‍ही बघा.

त्‍यावेळी मविआने काही बाबी न्‍यायालयाच्‍या निदर्शनास आणून देणे आवश्‍‍यक होते. मराठा समाजातील लोकप्रतिनिधी बोटावर मोजता येतील एवढेच आहेत. मराठा समाज दारिद्र्यरेषेखालीच आहे. मराठा आंदोलकांवरील दाखल गुन्ह्यांच्‍या मुद्द्यावर दोन दिवसांत बैठक घेणार असल्याचे उदयनराजेंनी सांगितले.

शंभूराज देसाई म्‍हणाले, ‘‘मराठा आरक्षण मुद्द्यावर दोन-तीन दिवस गैरसमज पसरविण्‍यात येत आहेत. आरक्षणाबाबत न्‍यायालयीन प्रक्रिया सुरू असून, गतकाळात आपल्‍या सरकारने मराठा समाजाला आरक्षण देत ते न्‍यायालयात टिकवले. नंतरच्‍या मविआ सरकारचे रिव्ह्यू पिटीशन न्‍यायालयाने नाकारले. यानंतर पुन्‍हा क्‍युरेटिव्‍ह पिटीशन दाखल केले असून, त्‍यासाठी माजी न्‍यायाधीश व कायदेतज्ज्ञांची मदत घेण्‍यात येत आहे,’’ असेही देसाई यांनी सांगितले.

सर्वोच्‍च न्‍यायालयात दाखल क्‍युरेटिव्‍ह पिटीशनमधील त्रुटी दूर करत मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्‍यासाठी आम्‍ही सर्वजण प्रयत्‍नशील असून, त्‍यात यश मिळेल.

- उदयनराजे भोसले, खासदार

जनतेने अफवांवर विश्‍‍वास न ठेवता चिथावणी देणाऱ्यांना बळी न पडता सरकारला सहकार्य करावे. आरक्षणाच्‍या मुद्द्यावर नव्‍याने काही अभ्‍यासकांचा समावेश सरकारकडून करण्‍यात येईल.

-शंभूराज देसाई, पालकमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT